BJP flag Sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : अहेरी विधानसभेत भाजप बॅकफूटवर; राष्ट्रवादीच्या एंट्रीने अस्तित्वच धोक्यात !

Assemblly Election News : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर 'कही खुशी कही गम'चे वातावरण आहे. पराभूत उमेदवारांची कारणमिमांसा सुरु आहे. त्यासोबतच पुढील वाटचालीची दिशा ठरविण्याचे आव्हान देखील आहे.

सरकारनामा ब्यूरो

Political News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. बहुमत असल्याने लवकरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सर्वत्र महायुतीच्या विजयाची व महविकास आघाडीच्या पराभवाची कारणे शोधली जात असतानाच विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर 'कही खुशी कही गम'चे वातावरण आहे. पराभूत उमेदवारांची कारणमिमांसा सुरु आहे. त्यासोबतच पुढील वाटचालीची दिशा ठरविण्याच्या आव्हानाबद्दल देखील विचारविमर्श सुरु झाले आहेत. (Bjp News)

महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाची एंट्री भाजपमधील मोठ्या वर्गाला पचनी पडली नव्हती. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा उघडपणे विरोध दर्शविलेला होता. अहेरी विधानसभाक्षेत्रातही तेच घडले आहे. महायुतीकडून धर्मरावबाबा आत्राम यांना कॅबिनेटची लाॅटरी लागली होती. परंतु, गेल्या काळात त्यांनी महायुतीतील घटकपक्षांना फारसे महत्व दिले नव्हते. किंबहूना दुर्लक्षच करतांना दिसले. त्यावेळेस त्यांच्या जावयांचीच चलती होती.

त्यामुळे भाजपचे (Bjp) पदाधिकारी व कार्यकर्ते नाखुश होते. पुढे धर्मरावबाबांना उमेदवारी न देता पक्षाचा उमेदवार द्यावा, यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपसाठी आग्रही भूमिका मांडली होती. पक्षश्रेष्ठींनी दखल न घेतल्यामुळे बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी वगळता बहुतांश भाजप बंडखोर उमेदवार अंबरीशराव आत्राम यांच्या पाठीशी उभी राहिले.

मात्र, अंबरीशराव आत्रामांच्या पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांकडे नेतृत्व शिल्लक राहिले नाही. धर्मरावबाबा आणि स्थानिक भाजप यांच्यात मागच्या कारकिर्दीत दूरपर्यंत समन्वय नव्हता. गेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच स्पष्ट दिसले होते. राज्यात भाजपची सत्ता आली तरी अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपचा सरपंच निवडून आणणे सुद्धा सध्या स्थितीत अशक्यप्राय झालेले आहे

याक्षेत्रातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष देत नाहीत, अशी सतत ओरड सुरु आहे. आगामी काळात भाजप पक्षश्रेष्ठी या भागाकडे लक्ष घालतील की नाही? धर्मरावबाबांना भाजपला विश्वासात घेण्याच्या सुचना मिळतील काय ? की भाजपचा पालकमंत्री देऊन जिल्ह्यातील पक्षबांधणीवर भर देतील या सर्व प्रश्नांच्या उत्तरामागे भाजपचे भवितव्य दडले आहे. त्यामुळे भाजपची पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT