Political Donations sarkarnama
महाराष्ट्र

Political Donations Video : भाजपवर पैशांचा पाऊस; काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षाला अधिक देणगी

BJP receives 2244 crore donations Congress ranks third : सर्वाधिक देणगी मिळालेल्या पक्षांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. तर, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षाला जास्त देणगी मिळाली आहे.

Roshan More

Political Donations : निवडणुकांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष भाजपसाठी लाभदायी ठरले. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर चार राज्यांतील निवडणूका पार पडल्या. भाजप मित्रपक्षांच्या साथीने पुन्हा केंद्रात सत्तेत आली. तर, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यात सत्ता कायम ठेवली. निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी हे वर्ष जेवढे लाभदायक ठरले तेवढेच ते देणगीच्या दृष्टिनेही ठरले आहे.

भाजपला 2023-24 या वर्षात 2 हजार 244 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे 2022-23 मध्ये मिळालेल्या देणग्यांपेक्षा ही रक्कम तिप्पट आहेत.

काँग्रेसला 2023-24 मध्ये सुमारे 289 कोटी रुपयांची देणगी मिळतील, तर 2022-23 मध्ये 79.9 कोटी रुपये मिळाले होते. सर्वाधिक देणगी मिळालेल्या पक्षांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. तर, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसपेक्षा बीआर पक्षाला जास्त देणगी मिळाली आहे. बीआरएसला 580 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजप आणि काँग्रेस दोघांना सर्वाधिक देणग्या मिळाल्या ज्याने भाजपला 723 कोटी रुपये आणि काँग्रेसला 156 कोटी रुपयेप्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने दिले आहेत. यंदा भाजपला काँग्रेसपेक्षा 776.82 टक्के अधिक देणग्या मिळाल्या आहेत.

2022-23 मध्ये सर्वाधिक देणग्या देणाऱ्या संस्थांमध्ये प्रुडंटला, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड, सीरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.

प्रादेशिक पक्षांना किती देणग्या?

प्रादेशिक पक्षांमध्ये केसीआर यांच्या बीआरएसचा सर्वाधिक देणगी 495.5 कोटी रुपये रोख्यांमध्ये मिळाले आहेत तर, डीएमकेला 60 कोटी रुपये आणि वायएसआर काँग्रेसला 121.5 कोटी रुपये मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT