Uddhav Thackrey Politics: आता शिवसेनेत फेरबदलाचे वारे, सुधाकर बडगुजर यांचे काय होणार?

Uddhav Thackrey; There will be a reshuffle in Shiv Sena, what will happens with Sudhakar Badgujar-महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
Sudhakar Badgujar & Sanjay Raut
Sudhakar Badgujar & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला. त्यामुळे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्य आहे. हे नैराश्य दूर करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत नुकतीच झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. यावर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याच्या सूचना केल्या आहेत.

Sudhakar Badgujar & Sanjay Raut
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'मी कोणालाही सोडणार नाही'

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पुढाकाराने पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत केले होते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. यामध्ये काय घडले हे सबंध महाराष्ट्राला ज्ञात आहे. हा निकाल अनपेक्षित आहे. यामध्ये नेमके काय घडले, याबाबत मतदारही साशंक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Sudhakar Badgujar & Sanjay Raut
Chalisgaon Sarpanch : अबब... सरपंचाने आधी मागितला प्लॉट, मग दहा लाखाची लाच!

मुंबईत झालेल्या बैठकीला कोणाला निमंत्रित करावे याबाबत अधिक निर्णय झाला होता. यामध्ये पक्षाचे शहर प्रमुख विलास शिंदे यांना पदाधिकाऱ्यांची नावे कळविण्यात आली होती. यामध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे नाव नव्हते. त्यामुळे बडगुजर हे काय निर्णय घेतात हा सध्या चर्चेचा विषय आहे.

माजी नगरसेवक बडगुजर हे पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत. गेले काही दिवस शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांना सातत्याने राजकीय दृष्ट्या टारगेट केले होते. त्यामुळे श्री बडगुजर विधानसभेत पराभूत झाल्यानंतर काय राजकीय निर्णय घेतात, हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही अतिशय सावध भूमिका घेतली आहे असे कळते.

आगामी महापालिका निवडणुका येत्या फेब्रुवारीमहिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी नव्या दमाने तयारी करावी. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्ष अधिक ताकद लावून लढणार आहे. त्यासाठी उमेदवारांची निवड अतिशय काळजीपूर्वक केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आल्याचे कळते.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षात नाशिकमध्ये काही पदाधिकारी पक्षांतराच्या मनस्थितीत असल्याचे लपून राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचे संकेत देण्यात आले आहे. येत्या दोन आठवड्यात काही पदाधिकाऱ्यांना नारळ देऊन नवे पदाधिकारी नियुक्त होतील, असे बोलले जाते.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा नवा जिल्हा प्रमुख कोण व तो नियुक्त करताना काय निकष लावले जाणार हा सध्या चर्चेचा विषय आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सध्या महाविकास आघाडीचा घटक आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेनेत चांगला समन्वय निर्माण होऊ शकला नाही अशा तक्रारी आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्ष महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार का? हा चर्चेचा विषय आहे. त्यासाठीच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष काय फेरबदल करतो, याकडे डोळे लावून बसले आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com