BJP News : कल्याण-डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्यास तसेच चिकन-मटण विक्रीला बंदी घातली आहे. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी या निर्णयावरून भाजपला टार्गेट केले आहे. त्यावरून आता भाजपने तब्बल 37 वर्षापूर्वींचा पुरावा दाखवत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले की, '5 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारने घेतलेला नसून 12 मे 1988 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना व काँग्रेस सत्तेत असताना घेतलेला निर्णय आहे. त्यानंतर महिनाभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून हा १५ ॲागस्टचा कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला.' उपाध्येय यांनी 37 वर्षापूर्वीची निर्णयाचे फोटो देखील शेअर केले आहेत.
१५ ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्यावरून महायुती सरकारवर आगपाखड करणारे आदित्य ठाकरे व जितेंद्र आव्हाड हे १५ ॲागस्ट कत्तलखाना बंदी साठी शरद पवारांचा निषेध करणार का? विरोध करणार का? त्यांना जाब विचारणार का? हा खरा प्रश्न आहे, असे देखील उपाध्ये यांनी विचारला
उपाध्ये यांनी म्हटले की, मविआ सरकारमध्ये २/३ वर्षांपूर्वी हे दोघेही (आव्हाड, आदित्य ठाकरे) मंत्री असतानासुध्दा १५ ॲागस्ट ला कत्तलखाने बंद ठेवण्यात आले होते, तेव्हा त्या विरोधात एक शब्दही हे दोघेही बोलले नाहीत. पण जितेंद्र आव्हाड व आदित्य ठाकरे यांना विस्मरणाचा आजार जडला असे म्हणणार नाही. कारण पक्ष व सत्ता गेल्याने सारासार विवेक गमावून नैराश्यात असलेल्या आव्हाड व ठाकरेंकडून अर्थात सरकारच्या प्रत्येक कृती विरोधात बोलण्याव्यतिरक्त वेगळी अपेक्षाच जनता करीत नाही.
महायुती सरकारने सूर्य पूर्वेला उगवतो असे म्हटले तरी हे लोक त्याला विरोध करतील, असा टोला उपाध्ये यांनी लगावला. तसेच अशी बंदी घालायला नको, असे म्हणणाऱ्या अजित पवारांना देखील उद्देशून उपाध्ये म्हणाले, प्रशासनावर उत्तम पकड असणाऱ्या तसेच महायुतीत उपमुख्यमंत्री असणाऱ्या व आता १५ ॲागस्टच्या मांसबंदीच्या निर्णयाला विरोध नोंदविणाऱ्या अजित पवार यांनाही हा निर्णय महायुती सरकारमध्ये झालाच नाही याची माहिती असणारच याबद्दल शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.