Eknath Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : आजचा दिवस एकनाथ शिंदेंसाठी महत्त्वाचा; ठाण्यात भाजप मोठा धक्का देणार? युतीही तुटणार...

BJP Strategy Meeting in Thane : 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता.

Roshan More

BJP Politics : आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभेतील मोठ्या यशानंतर भाजपमधून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात येत आहे. विशेषता मुंबई आणि ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपकडून करण्यात येत आहे.

आज (6 जून) ठाण्यात भाजपच्या कोकण विभागाची बैठक होणार आहे. आपल्या होमपिचवर होणाऱ्या भाजपच्या बैठकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष असणार आहे. कारण याच बैठकीत युती होणार की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा त्यांना मोठा फायदा देखील झाला. मुंबईत त्यांच्या नगरसेवकांची संख्या 31 वरुन 82 झाली तर, ठाण्यामध्ये त्यांना 23 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आजच्या भाजपच्या कोकण विभागाच्या बैठकीत भाजप नेत्यांकडून स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला जाऊ शकतो.

ठाण्यातील भाजप कार्यालयता होणाऱ्या या बैठकीला कोकण आणि ठाणे जिल्हातील तब्बल 14 जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, 180 पेक्षा अधिक मंडळ अध्यक्ष,पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, नितेश राणे करणार आहेत.

सर्व्हेने भाजपचा काॅन्फिडन्स वाढला

मुंबई महापालिकेसाठी भाजपने अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतील निष्कर्ष भाजपचा काॅन्फिडन्स वाढवणार आहे. भाजपने 150 पेक्षा अधिक जागा लढल्या तर भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो. मतदार भाजपसाठी सकारात्मक असल्याचा तसेच उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र आले तरी त्याचा परिणम भाजपच्या यशावर होणार नसल्याचे निष्कर्ष या सर्व्हेमध्ये आहेत. विशेष म्हणजे ठाण्यात देखील असा अंतर्गत सर्व्हे करून स्वबळाची चाचपणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2017 मध्ये ठाणे महापालिकेत पक्षीय बलाबल

पक्ष विजयी जागा

शिवसेना 67

भाजप 23

राष्ट्रवादी काँग्रेस 34

(2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकसंध होती)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT