Ajit Pawar| Murlidhar Mohol Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Pune strategy : पुणे जिल्ह्यात भाजप कुठे देणार दादांना साथ आणि कुठ दाखवणार हात; मुरलीधर मोहोळांनी सांगितले कुठे स्वबळ तर कुठे युती

bjp-pune-district-strategy : केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार तसेच ज्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील निवडणुकांची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेले मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतचे गणित सांगितले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकाबाबतची महायुतीची बोलणी जवळपास निश्चित झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजपला आव्हान देणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये युती बाबतचा अंतिम निर्णय झाला आहे. तर काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष वेगळे लढणार हे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार तसेच ज्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील निवडणुकांची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेले मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतचे गणित सांगितले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांना संभाव्य दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, 'स्थानिक पातळीच्या निवडणुकांसाठी वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना मोकळीक दिलेली आहे. आमच्या पक्ष नेतृत्वाने देखील आम्हाला सांगितला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढायचे असले तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळाची असेल तर त्या पद्धतीचा निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांना देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील महायुती वर मात्र कोणताही परिणाम होणार नाही.'

पुणे महापालिकेमध्ये स्वबळावरची निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, अद्याप महापालिकेच्या निवडणुकींना उशीर आहे. मात्र जेव्हा केव्हा निर्णय घेतला जाईल, तेव्हा कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

नगरपंचायतींचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आम्ही युती करत आहोत तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहोत. तळेगावमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत आहोत तर लोणावळ्यामध्ये वेगवेगळे निवडणूक लढवत आहोत, त्यासोबतच सासवड नगरपालिका, फुरसुंगी नगरपालिका आणि जेजुरी नगरपरिषदेमध्ये वेगळे लढत आहोत. मात्र, इंदापूरमध्ये आम्ही युती करून लढण्याचा विचार आहे. मात्र शिरूर आणि भोरमध्ये देखील स्थानिक नेतृत्वाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

एकूणच पुणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांचा विचार केल्यास काही बोटावर मोजणे इतक्या नगरपालिका सोडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगळेच लढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT