Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा उद्रेक; जुन्नरच्या नगराध्यक्षपद उमेदवारीचा वाद ‘मातोश्री’वर, संपर्कप्रमुखांनी बोलावली बैठक

Junnar Nagar Parishad Election 2025 : जुन्नर नगरपालिकेच्या उमेदवारी वाटपात मोठा गोंधळ निर्माण झाला असून नाराज पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोचल्या आहेत. चाकण येथील बैठकीत उमेदवारीवर फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त होते.
Shivsena UBT Leader
Shivsena UBT LeaderSarkarnama
Published on
Updated on
  1. जुन्नर नगरपालिकेच्या उमेदवारीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊन वाद ‘मातोश्री’पर्यंत पोहोचला आहे.

  2. गौरी शेटे यांच्या उमेदवारीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांची असहमती असून काहींनी थेट वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

  3. उमेदवारीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी चाकण येथे बैठक बोलावली असून आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

Pune, 15 Novermber : नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना, उमेदवारी वाटपामध्ये सदोपसुंदी सुरू झाली आहे. जुन्नर नगर पालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारीचा वाद थेट `मातोश्री’ च्या दारी पोचला आहे. इच्छुक असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आज शनिवारी (ता. १५ नोव्हेंबर) चाकण येथे संपर्कप्रमुखांच्या बैठकीत उमेदवारीवर फेरविचार होण्याची शक्यता शिवसेना ठाकरे गोटातून व्यक्त होत आहे.

जुन्नर (Junaar ) नगरपालिकेवर सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या पंचवार्षिकला शिवसेनेचे श्याम पांडे विजयी झाले होते. त्यानंतर शिवसेनेतील फूट, महाविकास आघाडीची स्थापना यामुळे शिवसेना विस्कळीत झाली आहे. शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मानाचे पान मिळाले नव्हते. विधानसभेला शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी आक्रमक पवित्रा घेत, विधानसभा लढविण्यावर ठाम राहिले.

त्यातच उपतालुका प्रमुख मोहन बांगर यांनी उमेदवारी विकल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केला होता. त्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेनेला (Shivsena) मानाचे पान देण्याचा शब्द खासदार कोल्हे यांनी दिला होता. त्यानुसार जुन्नर नगरपालिकेची उमेदवारी शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला आहे.

दरम्यान शिवसेनेकडून गौरी शेटे यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख दिलीप बामणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, शहर प्रमुख समीर भगत, माजी शहरप्रमुख शिवा खत्री आणि काही पदाधिकाऱ्यांमध्ये एका हॉटेलवर चर्चा झाली. या वेळी एबी फॉर्म दिल्याचा फोटो देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

Shivsena UBT Leader
Atul Bhosale : भाजप आमदार डॉ. अतुल भोसलेंचा मास्टरस्ट्रोक; तब्बल 42 वर्षांनी कट्टर विरोधकांना आणले एकाच व्यासपीठावर

दरम्यान, उमदेवारी न मिळाल्याच्या रागातून एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने स्थानिक नेत्यांना सुनावत, थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, आता संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी शनिवारी (ता. १५ नोव्हेंबर) संध्याकाळी चाकण येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत उमेदवारी अंतिम होणार असल्याचे समजते.

उमेदवारी अद्याप अंतिम झालेली नाही : सचिन अहिर

जुन्नर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. अद्याप उमेदवारी अंतिम झालेली नाही. उमेदवारीबाबत आज शनिवारी (ता. १५ नोव्हेंबर) सायंकाळी चाकण येथे बैठक आहे. या बैठकीला जुन्नरमधील इच्छुकांसह शहर, तालुका, उपतालुका प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना बोलविले आहे. यांच्यासोबत तसेच खासदार अमोल कोल्हे यांच्याशीही चर्चा करून उमेदवारी जाहीर केली जाणार आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कमप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी सांगितले.

Shivsena UBT Leader
Unmesh Patil case : शिवसेनेच्या शिलेदाराला न्यायालयाचा मोठा दिलासा; निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा डाव उलटवला!

1) शिवसेनेत वाद का निर्माण झाला?
गौरी शेटे यांच्या उमेदवारीवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.

2) तक्रार कुणाकडे करण्यात आली?
काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली.

3) उमेदवारीचा अंतिम निर्णय कधी होणार?
आज संध्याकाळी चाकण येथे होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

4) उमेदवारी ठरविण्यात कोण सहभागी आहेत?
शहर व तालुका पदाधिकारी, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि खासदार अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com