Devendra Fadnavis and Chandrasekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

Video Bjp News : राज्यात मोठा धमाका; भाजपचे दोन नेते दिल्लीत

Sachin Waghmare

New Dehli News : लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर आता लवकरच आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11 जागेसाठी निवडणूक होत आहेत. 12 जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे.

राज्यातील भाजपचे (Bjp) दोन बडे नेते दिल्लीत गेले असून त्याठिकाणी विधान परिषदेसाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते. या बाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही नावे निश्चित करण्यात येणार आहेत. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागांसाठी 35 जणांनी उमेदवारी भाजपकडे मागितली आहे. या पैकी पाच नावे फायनल केली जाणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला या बैठकीत जर परवानगी मिळाली तर 27 जूनला अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. (Bjp News)

दिल्लीत नावे निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत आल्याचे समजते. सोमवारी रात्री त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. यामध्ये पाच जणांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. यापूर्वी मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या 35 जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली आहे. या पैकी पाच जणांची नावे फायनल केली जाणार आहेत.

विधान परिषद निवडणूक 12 जुलै रोजी होणार असून यासाठी 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे लवकरच नावे निश्चित केली जाणार असल्याचे समजते. या नावाची अधिकृत घोषणा लवकरच दिल्लीतून करण्यात येणार असल्याचे समजते.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bawankule) हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून त्यासोबतच यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला या बैठकीत परवानगी मिळाली तर 27जूनला अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT