Abdul Sattar - Sandipan Bhumre : भुमरे-सत्तार यांच्यात तिसरा कोण ? पालकमंत्री पदावरून टोलेबाजी..

Shivsena Political News : कन्नडमध्ये रविवारी झालेल्या सत्कार कार्यक्रमात अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे, डाॅ. भागवत कराड एकत्र आले होते. तीन मित्र एकत्र आल्यामुळे भुमरे यांचे भाषण चांगलेच बहरले.
Abdul Sattar, Sandipan Bhumre
Abdul Sattar, Sandipan BhumreSarakarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राजकारणात कोण कधी काय भूमिका घेईल आणि कोणाची साथ देईल याचा काही नेम नाही. राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून एकत्र काम करणारे संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात सध्या चांगलीच गट्टी जमली आहे. संदीपान भुमरे खासदार म्हणून निवडून गेल्यापासून संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून चर्चा सुरू आहे.

कन्नडमध्ये रविवारी झालेल्या सत्कार कार्यक्रमात अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), डाॅ. भागवत कराड एकत्र आले होते. तीन मित्र एकत्र आल्यामुळे भुमरे यांचे भाषण चांगलेच बहरले.

अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे हेरून भुमरे यांनी त्यांना आणखी बळ देण्याचा प्रयत्न केला. सत्तार शेठ हेच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्री करा म्हणून घेऊन गेले होते. आता मी खासदार झाल्यामुळे या पदासाठी सत्तार यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

माझ्या मंत्रीपदाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेव्हा सत्तार मला घेऊन गेले होते, तेव्हा काहीही देताना आमच्या दोघात तिसरा कोणी आणू नका, असे ते म्हणाले होते. त्यामुळे सत्तार पालकमंत्री होतील, अशा शुभेच्छा देत भुमरे यांनी वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले. जिल्ह्याच्या राजकारणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची भूमिका कायमच महत्वाची राहिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी वारंवार प्रासंगिक करार याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार सुरू राहील, असे ते बोलू लागले आहेत. मी मुळचा शिवसैनिक नाही, प्रासंगिक करारवाला शिवसैनिक आहे म्हणत आपली पुढील वाटचाल वेगळी असेल असे संकेतच सत्तार देत आहेत.

Abdul Sattar, Sandipan Bhumre
Suryakanta Patil News : आधीच संकटात असलेल्या भाजपला सूर्यकांता पाटलांची नाराजी भोवणार?

अशावेळी खासदार संदीपान भुमरे यांनी पालकमंत्री पदासाठी भुमरे यांना शुभेच्छा देणे आणि दोघात तिसरा नको, असे म्हणणे यावरून सत्तार-भुमरे जोडी आमदार संजय शिरसाट यांना टाळण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात फारसे सख्य नाही. यापूर्वी मंत्रिमंडळातील समावेशावर या दोघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोरच खडाजंगी झाली होती.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्तार आणि भुमरे यांचे फाटले होते. पण निवडणूक संपली की आमच्यातले वैर संपते असे सांगत भुमरे यांनी पुढे त्यांच्याशी जुळवून घेतले. आता लोकसभा निवडणुकीत आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या पश्चिम मतदारसंघातून भुमरे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले.

पण पालकमंत्री पदासाठी भुमरेंची पसंती सत्तारांनाच असल्याचे त्यांच्या कन्नडच्या सत्कार समारंभातील विधानवरून दिसून आले. संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री दोन महिन्यांसाठी बदलला जाणार नाही, अशी एकीकडे चर्चा सुरू असताना भुमरेंनी मात्र सत्तारांना शुभेच्छा देऊन ते मोकळे झाले.

(Edited By : Sachin Waghmare)

Abdul Sattar, Sandipan Bhumre
Jarange Vs Vikhe : जरांगे-पाटलांनी राधाकृष्ण विखे-पाटलांना सुनावलं; म्हणाले, "तुमच्यामुळे..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com