New Delhi : लोकसभा निवडणुकीत मातब्बर मंडळींना पराभूत करीत दिल्लीत गेलेल्या नव्या दमाच्या महाराष्ट्रातील खासदारांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाने दिल्ली गाजवली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यासह दिगग्ज नेत्यासोबत आंदोलन करत मोदी सरकारच्या विरोधात वज्रमूठ आवळत 'है तयार हम' असे दाखवून दिले. राज्यातून 29 नवे चेहरे प्रथमच लोकसभेत गेले आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी झालेले खासदार दिल्लीत पोहचले आहेत. संसदेच्या अधिवेशनापूर्वीच इंडिया आघाडीचे नेते मंडळी सोमवारी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात महाराष्ट्रातील इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP), शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार सहभागी झाले. (Lok Sabha Session News)
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर देशभरातील खासदार सोमवारी प्रथमच दिल्लीत दाखल झाले. लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात या खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर ते सभागृहाचे अधिकृत सदस्य होणार आहेत.
राज्यातून 29 नवे चेहरे प्रथमच लोकसभेत गेले आहेत. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे पाच तर विरोधी पक्षाचे 24 जण प्रथमच लोकसभेत पोहचले आहेत. काँग्रेसचे (Congress)13, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 6 तर शिवसेना ठाकरे गटाचे चार खासदार तर अपक्ष एक पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. अधिवेशनाच्या काळात हे खासदार कुठे बसणार, यांच्या शेजारी कोण असणार ? याची उत्सुकता लागली आहे
नव्याने निवडून आलेले हे खासदार अधिवेशनावेळी काय बोलणार?, कोणता प्रश्न पहिल्यांदा मांडणार, कोणता मुद्दा उचलून धरणार त्या सोबतच लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना कोणत्या भाषेतून घेणार याची उत्सुकता त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना लागली आहे. त्यामुळे आपला नवनिर्वाचित खासदार दिल्ली दरबारी कोणते प्रश्न मांडणार व त्यांची कामगिरी कशी असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ही मंडळी पहिल्यांदाच संसदेत
काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, प्रशांत पडोळे, नामदेव किरसान, शिवाजी काळंगे, वसंत चव्हाण, गोवाल पाडवी, कल्याण काळे, शाहू महाराज हे नवे चेहरे आहेत. शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, नरेश म्हस्के, शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे, धैर्यशील पाटील, नीलेश लंके, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, अमर काळे, भाजपचे मुरलीधर मोहोळ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे, ठाकरे गटाचे संजय देशमुख, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील-आष्टीकर, अपक्ष विशाल पाटील हे पहिल्यांदा विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.