Congress Mumbai BMC election  Sarkarnama
महाराष्ट्र

BMC News : मुंबई महापालिकेत गदारोळ ; शाळा दत्तक धोरणावरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; नगरसेवकांचा महापौरांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न!

Mumbai civic body chaos News : काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा महापौरांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. तर, ठाकरेंची शिवसेना मात्र सगळ्यातून अलिप्त दिसून आली. मात्र, त्यांना वेळीच रोखण्यात आले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी सुरु असलेल्या चर्चेवरून जोरदार गदारोळ पाहवयास मिळला. यावेळी शाळा दत्तक धोरणावरून सभागृहात काँग्रेसचे (Congress) नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. या चर्चेवरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ उडाला. या सर्व प्रकरावरून भाजप-काँग्रेस नगरसेवकामध्ये चांगलीच जुंपली. यावेळी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा महापौरांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. तर, ठाकरेंची शिवसेना मात्र सगळ्यातून अलिप्त दिसून आली. मात्र, त्यांना वेळीच रोखण्यात आले.

पालिकेच्या सभागृहात गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा खासगी संस्था व स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचे धोरण तातडीने रद्द करण्याबाबतची ठरावाची सूचना महानगरपालिका सभागृहात मांडण्यात आली. ही सूचना नगरसेवक हैदरअली शेख यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी दिली होती. त्यावरुन, चर्चेत सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ उडाला.

महानगरपालिकेकडून 2007 सालापासून शाळा दत्तक देण्याचे धोरण राबविले जात आहे. मात्र, काही संस्थांकडून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याची बाब निदर्शनास आल्याचा उल्लेख काँग्रेस नगरसेवक शेख यांच्या सूचनेत करण्यात आला. केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार आणि न्यायालयीन निर्देशांनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर TET उत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

महानगरपालिकेने आयसीएसई, सीबीएसई, आयबी व केंब्रिज मंडळांच्या शाळा सुरू केल्यामुळे पालकांचा प्रतिसाद वाढला असून विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळांच्या इमारतींची कमतरता भासत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शाळा दत्तक धोरणाचा पुनर्विचार करून ते तातडीने रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा तसेच यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात यावी, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली होती. या सूचनेवरुन सभागृहात काँग्रेस आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला.

सभागृहाच्या कामकाजावर परिणाम

सभागृहात सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान वातावरण अचानक तापले. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी संतप्त होत महापौरांच्या दिशेने धाव घेतल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभागृहाच्या प्रतिष्ठेला अशा प्रकारचे वर्तन शोभणारे नाही. सर्वच सदस्यांनी सभागृहाची शिस्त आणि परंपरा जपावी, असे आवाहन सभागृह नेते गणेश कणखर यांनी केले. या प्रकारामुळे सभागृहाच्या कामकाजावर काही काळ परिणाम झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT