NCP-BJP Politics : शिंदेंना शह! गोगावलेंचा गेम, सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर; भाजप-राष्ट्रवादी सत्ता येणार? तटकरेंचा डाव

Raigad ZP Politics : रायगड जिल्हा परिषदेत सध्या कोणाची सत्ता येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून भाजप-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा समोर येत आहे.
raigad zilla parishad Politics
raigad zilla parishad Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती अंतिम झाली आहे.

  2. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात आले आहे.

  3. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश न मिळता अध्यक्षपद भाजपने आपल्या ताब्यात घेतले आहे.

Raigad Political News : रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुतीतील वादामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. येथे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला बाहेर ठेवून युती करण्याची खेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खेळली आहे. त्यांची ही खेळी आता यशस्वी झाली असून भाजपनेच युतीची घोषणा केली आहे. यामुळे राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही महायुती असावी यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेले प्रयत्न फेल गेले आहेत. त्यांनी तटकरेंशी घेतलेल्या भेटीत शिवसेनेबाबत सकारात्मक चर्चा झाली नसल्याचेच आता समोर आले आहे. तर आता भाजप-राष्ट्रवादी युतीवर शिक्कामोर्तब झाला असून अध्यक्षपदही भाजपने आपल्याकडे खेचून घेतले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतही जिल्ह्यात महायुती एकसंघ नव्हती. येथे राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेंची शिवसेना वेगळी लढली. सदस्यसंख्या 59 असणार्‍या जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जिंकल्या. त्यांचे २१ सदस्य निवडून आले असून बहूमतीसाठी ९ सदस्यांची गरज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले आहे. भाजप 15 जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून ठाकरेंची शिवसेना 05 आणि काँग्रेसने 02 जागा जिंकल्या आहेत.

यामुळे येथे महायुतीतील पक्षांनाही सत्तास्थापनेचा आकडा मिळालेला नाही. अशातच येथे पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद विकोपा गेला असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीत टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सतत खटके उडताना दिसत आहेत.

raigad zilla parishad Politics
NMC BJP Politics: अजित दादांची राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळणार; भाजपसाठी ऑल सेट, स्थायी समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप निश्चित!

यामुळेच १५ जागा जिंकणाऱ्या भाजपने सेफ पाऊल टाकत राष्ट्रवादीबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता निर्णय झाला असून भाजप राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भाजपकडे जाणार आहे. तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे.

दरम्यान ताणलेले संबंध तुटू नयेत म्हणून उदय सामंत यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. तसेच राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही महायुतीच असावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रवादीकडे करत शिवसेनेला सत्तेत सोबत घ्यावे अशी विनंती केली होती.

पण आता त्यांच्या ही शिष्टाई कामी आली नसून त्यांचे प्रयत्न फेल गेले आहेत. येथे भाजपने युतीबाबत आपली भूमिका ठरवली असून राष्ट्रवादीशी युती केली आहे. यामुळे आता भाजपकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद जाणार असून उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे राहणार आहे. तर सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला आता विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

raigad zilla parishad Politics
Vidarbha BJP Politics: रवींद्र चव्हाणांनी साधला गडकरी-फडणवीस बॅलेन्स: भेंडे, पोटे, फुकेंकडे विदर्भाची सूत्र; डेहनकरांना बंडखोरीनंतरही बक्षीस

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता स्थापन झाली आहे?
भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती स्थापन झाली आहे.

2. शिवसेनेची भूमिका काय राहिली?
सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात आले आहे.

3. अध्यक्षपद कोणाकडे गेले आहे?
अध्यक्षपद भाजपकडे गेले आहे.

4. उदय सामंत यांच्या भेटीचे काय झाले?
त्यांच्या प्रयत्नांनंतरही शिवसेनेबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही.

5. या निर्णयाचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
जिल्हास्तरावर महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com