Pune Congress : पुण्यात दारूण पराभवानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'मास्टरप्लॅन' तयार!दौंड, इंदापूर, बारामती टार्गेटवर

Congress action mode after Pune district defeat : पुणे जिल्ह्यातील दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. बड्या नेत्यांनी तातडीची बैठक घेत पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
congress
congressSarkarnama
Published on
Updated on

Pune News : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा पुणे जिल्हा परिषद सध्या पूर्णपणे काँग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. 9 फेब्रुवारीला जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला पुणे जिल्हा परिषदेच्या एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तसेच पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील हीच परिस्थिती होती.

काँग्रेसने यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत 26 जागांवर उमेदवार उभे केले होते, पण सर्व ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून 1999 पर्यंत सलग 38 वर्षे पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. 2017 च्या निवडणुकीतही काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा पूर्ण शून्यावर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर काँग्रेसने आत्मचिंतन केले असून पुन्हा एकदा गत वैभव मिळवण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे.

पुण्यातील नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेत दारुण पराभव झाल्याने काँग्रेस पक्ष आता संघटना बळकट करण्याच्या मोहिमेत उतरला आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या नेतृत्वात दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांतून संघटनात्मक दौरे सुरू झाले आहेत. या दौऱ्यात कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पक्ष तळागाळात मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

दौंड, इंदापूर, बारामती तसेच पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठका घेऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या जात आहेत. संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी, आगामी निवडणुका आणि स्थानिक प्रश्नांवर यावेळी चर्चा करून आगामी काळातील नियोजन आखले जात आहे.

‘काँग्रेस आपल्या दारी’ या संकल्पनेतून जिल्हा नेतृत्व थेट तालुकास्तरावर पोहोचत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना ताकद देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात काँग्रेस अधिक सक्षम करून तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवू असे चव्हाण यांनी सांगितले आहे.

सासवडमध्ये आंदोलन

दरम्यान, केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पुरंदर तालुका काँग्रेसच्यावतीने सासवड येथील शिवतीर्थावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव देविदास भन्साळी, दत्ता झुरंगे, राजेंद्र बरकडे, आकाश मोरे आदींनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com