Mumbai Mayor post Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai Mayor Post : दिल्ली ठरवते, मुंबईत अडकते! भाजप-शिवसेनेचं जुळेना, महापौरपद भाजपच्या वाट्याला, तरी शिंदेंना नकोय सत्तेत घाटा

BMC Mayor Election Likely to be Delayed Amid BJP–Shinde Sena Power Sharing Row : मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपावर भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेचे एकमत होत नसल्याने महापौरपदाची निवडणूक लांबण्याची शक्यता आहे.

Pradeep Pendhare

BMC Mayor election delay : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. दरम्यान, 31 जानेवारीला नवा महापौर विराजमान होईल, असे पालिकेने स्पष्ट केले होते; मात्र भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी झाली नसल्याने महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

गटनोंदणीचे निमित्त सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात महापालिकेतील सत्ता वाटपावरून भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेचे एकमत होत नसल्याचे खरे कारण आहे.

मुंबई महापालिकेतील (BMC Election) महापौरपदाचा तिढा थेट दिल्लीपर्यंत गेला. एकनाथ शिंदे यांनी दबावाचं राजकारण करत, महापौरपदावर दावा सांगितला होता. हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतील केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. आता भाजपच्या वाट्याला महापौरपद गेल्याचं निश्चित झालं आहे. परंतु, सत्तेत मोठा वाटा हवा, अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. त्या वाटण्यावरून आता मुंबई महापालिकेत पेच निर्माण झाला असून, महापौर पदाची निवडणूक पुढे गेल्याचे दिसते.

भाजप-शिवसेना युतीला मुंबई महापालिकेत निर्विवाद बहुमत मिळाले. भाजपला सर्वाधिक 89, तर एकनाथ शिंदे शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. बहुमत असूनही महायुतीचा (Mahayuti) महापौर ठरलेला नाही. भाजप महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असून, त्यांनी महापौरपदावर दावा केला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना या पदासाठी अडून बसला आहे. महापौरपद, स्थायी समिती, सुधार समिती तसेच विशेष समित्यांसाठी एकनाथ शिंदे पक्ष आग्रही आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत अद्याप एकमत न झाल्याने मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रिया झालेली नाही.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारीला मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र या अडचणी पाहता नवीन महापौराची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. गटनोंदणी पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सत्तावाटपावर चर्चा

राज्यातील महापालिकांमधील सत्ता वाटपावर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार आहे. मुंबईत शिवसेनेला अडीच वर्षे महापौरपद हवे आहे. याशिवाय उपमहापौर, स्थायी समिती, सुधार, बेस्ट आदीपैकी काही समित्यांची अध्यक्षपदे हवी आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिकांमध्ये एकत्रित निर्णय़ बैठकीत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT