Vijay Wadettiwar On Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आमदार गायकवाडांना सत्तेचा माज, विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले...

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या माज करणाऱ्या कृतीवर काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच भडकलेत. शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कृतीवरून विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आगपाखड केली.

काँग्रेसचे (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. आमदार गायकवाड यांचा मुलगा मृत्यूंजय याचा वाढदिवस साजरा करत आहेत. मुलाच्या वाढदिवसचा केक तलवारीने कापून तो, तलवारीच्याच धारदार पात्यावर उचलून मुलगा, पत्नी आणि कार्यकर्त्यांना भरवला. या व्हिडिओ आता समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे.

विजय वडेट्टीवार आमदार गायकवाड यांच्या या कृतीवर चांगलेच भडकले आहेत. या सर्व सेलिब्रेशनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत, वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलं आहे. "सत्तेचा माज काय असतो, याचे प्रदर्शन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार वारंवार करत असतात", असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

नियमानुसार तलवारीचे असे प्रदर्शन आणि वापर करता येत नाही. पण आपल्या पाठिंब्याने बनलेले मुख्यमंत्री राज्यात असल्यामुळे वाटेल, तो माज करायला आणि मिरवायला शिंदे गटाच्या आमदारांना सूट मिळालेली आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रासाठी तलवार हे शौर्याचे प्रतीक आहे. तलवार स्वराज्याच्या लढ्यात होती, महाराष्ट्राच्या शत्रूंवर वार करण्यासाठी होती. आणि शिंदे गटातील आमदार तलवारीचा वापर केक कापायला करतात, असे उपरोधिकपणे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्यूंजय याचा वाढदिवस 15 ऑगस्टला असतो. बुलढाण्यातील जैस्तंभ चौकात वाढदिवस साजरा केला. मृत्यूंजय हा युवासेनेचा जिल्हाध्यक्ष आहे. संजय गायकवाड धमक्या देणे, मारहाण करणे यासाठी कुप्रसिद्ध आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT