C. P. Radhakrishnan  Sarakarnama
महाराष्ट्र

C. P. Radhakrishnan News : शपथ घेताच सी. पी. राधाकृष्णन यांचं रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत मोठं विधान

Political News : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी राज्यपालपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत मोठं विधान केलं आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या गेल्या चार वर्षांपासून रखडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत नुसतीच चर्चा होते.

महाविकास आघाडीने 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यानंतर सरकार बदलले आणि त्यांनी ही यादी परत पाठवली. त्यानंतर अद्यापपर्यंत नियुक्त्या झाल्या नाहीत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrushnan) यांनी बुधवारी राज्यपालपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत मोठं विधानं केलं आहे. (C. P. Radhakrishnan News)

झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांना मुंबई उच्च न्यायालयचे मुख्य न्याय मूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ दिली. राधाकृष्णन यांनी रमेश बैस (Ramesh Bais) यांची जागा घेतली आहे. बैस हे 18 फेब्रुवारीपासून 2023 पासून राज्यपाल होते. त्यापूर्वी भगतसिंह कोश्यारी हे काही काळ राज्यपाल होते.

चार दिवसांपूर्वीच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांनी राज्याचे 22 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यानंतर मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत "जे गरजेचे असेल ते नक्की केले जाईल", असे सांगत सीपी राधाकृष्णन यांनी मोठं विधान केले आहे.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, 'मी येत्या काळात राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करेल, राज्याच्या विकासासाठी काम करणार आहे. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव कदाचित राधाकृष्णन नसते. मी शेतकरी, ओबीसी, एसटी एससी या प्रवर्गाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवरुन महाविकास आघाडी आणि कोश्यारी यांच्यामध्ये मोठा वादही झाला होता. त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले मात्र, त्यांनी नियुक्त्या शेवटपर्यंत केल्या नाहीत. महायुतीचे सरकार येऊनही दोन वर्ष पूर्ण झाले आहेत तरी नियुक्ती करण्यात आली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT