Kishore Shinde : मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा घातपात? किशोर शिंदेंना वेगळाच संशय

MNS Kishor Shinde Jai Malokar Death : मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचे मनसेचे सचिव आणि मनसे लीगल सेल महाराष्ट्राचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी जय मालोकार यांच्यासोबत घातपात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.
MNS Kishor Shinde
MNS Kishor ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यामध्ये अकोल्यात राडा झाला. या राड्यात सहभागी असलेले अकोला मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष जय मालोकार यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

या मृत्यू प्रकरणी मनसेचे मनसेचे सचिव आणि मनसे लीगल सेल महाराष्ट्राचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी जय मालोकार यांच्यासोबत घातपात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.

'अमोल मिटकरीची गाडी फोडणारा आमचा अकोल्यामधील लढवैय्या मनसैनिक विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सकाळची घटना घडल्यानंतर जयवर कुणाचा दबाव होता का..?, या घटनेत काही घातपाताची शक्यता आहे का याची देखील चौकशी व्हावी,' अशी मागणी ट्विट करत किशोर शिंदे यांनी केली आहे.

MNS Kishor Shinde
Video Uddhav Thackeray : 'एक तर तुम्ही राहाल नाही तर मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

पुण्यामध्ये आलेल्या पुरानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे हे 'सुपारीबाज' असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे मनसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली.

महाराष्ट्रात सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात संघर्ष सुरू आहे. राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी काल अमोल मिटकरींची गाडी फोडली. त्यानंतर काही तासांतच मिटकरींची गाडी फोडणारा मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

अमोल मिटकरींची गाडी फोडल्यानंतर काही वेळाने जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण थोड्या वेळाने त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यामुळे हे प्रकरण आणखीन तापले आहे.

जयच्या कुटुंबांनाही संशय

हृदयविकाराच्या झटक्याने जय याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र जयच्या मृत्युची सखोल चौकशी व्हावी, या अगोदर जयला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता, असे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी जयचा मोठा भाऊ विजय मालोकार यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी चौकशीची मागणी जयच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

(Edited By Roshan More)

MNS Kishor Shinde
Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार गट लढविणार 'या' जागा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com