Uddhav Thackeray : "लोकसभेला आपण मोदींना घाम फोडला, आता...", उद्धव ठाकरेंचं 'चॅलेंज'

Uddhav Thackeray On Bjp : "आपलं आणि भाजपचं हिंदुत्व हे वेगळं आहे. हिंदुत्व म्हणजे तोडा, फोडा आणि राज्य करा, असं नाही आहे," असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं.
uddhav thackeray narendra modi.jpg
uddhav thackeray narendra modi.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभेनंतर अनेक मोठे नेते आपल्याला 'मातोश्री'वर येऊन भेटून गेले. उद्धवजी आपण देशाला नवी दिशा दाखवलीत, अशा शब्दांत आपल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केलं. त्यांना मी सांगितलं, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत ठीक पण आपल्या कुणी वाकड्यात गेले की आपण सोडत नाही, असं शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शाखाप्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संपन्न झाली. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

"शिवसेना तळपती तलवार"

"शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. लोकसभेला आपण असे लढलो की पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनाही घाम फुटला. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला याच," असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं आहे.

uddhav thackeray narendra modi.jpg
Devendra Fadnavis :'फडणवीसांना संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील', बावनकुळेंची टीका !

"सगळं सहन करून मी जिद्दीनं उभे राहिलो"

"मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) डाव रचले होते, असं अनिल देशमुखांनी सांगितलं. सगळं सहन करून मी जिद्दीनं उभे राहिलो आहे. एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन," असा इशारा ठाकरे यांनी फडणवीसा यांना दिला आहे.

uddhav thackeray narendra modi.jpg
Uddhav Thackeray News : तुमच्या नाकावर टिच्चून सत्ता आणून दाखवतो; उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना चॅलेंज

"पक्षात राहून दगाबाजी करू नका"

"आपलं आणि भाजपचं हिंदुत्व हे वेगळं आहे. हिंदुत्व म्हणजे तोडा, फोडा आणि राज्य करा, असं नाही आहे. आपल्यातील काहींना फोन येत असतील. तसेच, याने पक्ष सोडला, त्यानं पक्ष सोडला, असं कानावर येते. जायचं तर उघड जा. पण, पक्षात राहून दगाबाजी करू नका," असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

"एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहिन"

"मी आणि शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक राहतील. त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवेन. पैसे मिळत आहेत, म्हणून आईशी गद्दारी करू नका. माजी नगरसेवक जात आहेत, त्यांनी आताच जावं. एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहिन, या हेतूने मी उतरलो आहे. जे राहतील ते माझ्या मागे. समोर असतील ते माझे शत्रू असतील. कालपर्यंत माझ्या घरातील लोक माझ्याच घरावर चालून येत आहेत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com