Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion Sarkarnama
महाराष्ट्र

Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जून आधी ? अमित शाहांची शिंदे - फडणवीसांना 'ही' सूचना

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (दि.४ जून ) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या भाजप आणि शिंदे गटातील नेतेमंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत झालेल्या तीन तासांच्या मेगा बैठकीत दोन्ही नेत्यांनी राज्यातील कॅबिनेट विस्तारावर चर्चा केली. यावेळी विस्तारात महिलांना संधी देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास तो 19 जून आधी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी 'हा' फॉर्म्युला

यात महत्वाची बाब म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार( Cabinet Expansion) आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची सूचना शाह यांनी दिल्याची माहिती आहे. महिलांच्या सन्मान ही राज्याची पहिला प्राथमिकता असली पाहिजे असंही बैठकीत ठरल्याचं बोललं जात आहे.

या बैठकीत अमित शाह(Amit Shah) यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी किंवा बंगल्यावर बसून नाही तर फिल्डवर ऊतरून काम करणारे नेते कॅबिनेटमध्ये घ्यायला हवेत अशी भावना व्यक्त केल्याची चर्चा आहे.

फडणवीसांच्या सागर बंगल्यावर खलबतं..

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कायमच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेग आला आहे.यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली.

जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत त्यामुळे या बैठकीत नेमके काय खलबतं झाली यावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीला मुंबईतील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT