chandrakant patil, amol kolhe,  sharad pawar
chandrakant patil, amol kolhe, sharad pawar sarkarnama
महाराष्ट्र

शरद पवारांच्या भूमिकेशी चंद्रकांत पाटील सहमत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, अंकुश काकडे यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हेंची पाठराखण केली आहे. याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही ''कोल्हे हे अभिनेता म्हणून ते कोणतीही भूमिका साकारू शकतात,'' असे विधान करुन कोल्हेचे (amol kolhe) समर्थन केलं आहे. पाटील माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''कोल्हेंनी ते नथुराम गोडसेंच्या विचाराशी ते किती सहमत आहेत का?, हे त्यांनी एकदा जाहीर करावे. एक अभिनेता म्हणून ते कोणतीही भूमिका साकारू शकतात. ते नथुराम गोडसे ते अफझल खानचीही भूमिका साकारू शकतात यात मला काही चुकीचे वाटत नाही,''

'अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे. रामराज्य सिनेमा असेल यामध्ये रावणाची भूमिका करणारी व्यक्ती ही रावण असू शकत नाही. सीतेचं त्याने अपहरण केलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होतं नाही,'' असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

नगर पंचायत निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की काही ठिकाणी भाजपने ९ पैकी ९ जागा पटकावल्या आहेत. अशा २० नगरपंचायती आहेत. २० ते ३७ नगरपंचायती आमच्या ताब्यात येतील. ज्या नगरपंचायतीमध्ये भोपळा फोडता आला नाही, त्यात शिवसेना पुढे आहेत. 32 ठिकाणी शिवसेनेने भोपळा फोडला नाही.

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. यावर कॉग्रेसने टीका केली आहे. यावर पाटील म्हणाले, ''नेताजीचे स्वातत्र्यांसाठी एक योगदान आहे.

हे काँग्रेसला मान्य आहे ना? मग विरोध का करतात,'' या पुतळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वट करीत म्हटलं आहे की, 'संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे. यावेळी मला हे सांगताना आनंद होतोय की, नेताजींची ग्रेनाईटचा भव्य पुतळा इंडिया गेटवर उभारला जाणार आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी भारताच्या कृतज्ञतेचे प्रतिक असेल,'

''राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आहे. त्यात नवीन काय आहे. विदेशी महिला आम्हाला चालणार नाही, असे पवार म्हणाले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली

देशाचे नेतृत्व कोणी करावे ज्यांना तुम्ही विदेशी महिला म्हणाला आणि आता त्याच सोनिया गांधी यांना तुम्ही डोक्यावर घेत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावे,'' असा टोला त्यांना लगावला.

गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने नऊ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ''त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. गेल्यावेळी यांना 700 मते पडली आणि यावेळी ते म्हणतात, आमच्या शिवाय मुख्यमंत्री होणार नाही,'' ''गोव्यात आम्हाला २२ जागा मिळतील,'' असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT