Nagpur News : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत येथील जनतेने त्रिशंकू कौल दिला आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी एकीकडे सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. या ठिकाणी बहुमतासाठी 34 चा आकडा हवा आहे. त्यापासून सध्या तरी काँग्रेसला चार नगरसेवकांची गरज आहे. तर दुसरीकडे भाजपचे संख्याबळ 23 इतके आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
त्यातच या ठिकाणी एका बाजूला काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार तर दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार जोर लावत आहेत. त्यातच काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर व वडेट्टीवार यांच्यात गटस्थापन करण्यावरून रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. त्यातच आता सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' बंडखोरांच्या हातात आला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-२७, भाजप २३, उद्धव ठाकरेंची सेना ६, वंचित २, अपक्ष २ व इतर सहा असे पक्षीय बलाबल आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या सेनेने वंचितसोबत युती करीत एकूण आठ नगरसेवक निवडून आणले. यात वंचितचे दोन तर सेनेचे सहा नगरसेवक आहेत. या आठ जणांच्या अधिकृत गटाने काँग्रेसचे दोन बंडखोर नगरसेवक गळाला लावले आहेत. त्यामुळे या सत्ता स्थापनेत मोठे ट्विस्ट पाहावयास मिळत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे व वंचितचे हे सर्व दहा नगरसेवक शनिवारी रात्री अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले असून, तिथून ते मुंबईला उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना या ठिकाणी महापौरपदासाठी अडून बसली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची गोची झाली आहे.
त्यामुळे याठिकाणी आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे 34 चा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला केवळ 4 नगरसेवकांची गरज आहे. मात्र, पक्षांतर्गत वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील वादाचा फायदा घेत बंडखोरांनी स्वतःची किंमत वाढवली आहे. दुसरीकडे भाजपच्या 23 जागा आहेत. भाजपकडे (BJP) संख्याबळ कमी असले तरी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 6 आणि अपक्षांना सोबत घेऊन 'अँटी-काँग्रेस' आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार करत आहेत.
त्यातच आता बंडखोरांचे महत्त्व आले आहे. हे दोन बंडखोर नगरसेवक काँग्रेसचे आहेत. हे दोघेजण आता ठाकरेंची शिवसेना व वंचितच्या सोबत गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूचे पारडे जड होणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन महापौरपद मागितल्याने काँग्रेस आणि भाजप दोघांचीही डोकेदुखी वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.