महाराष्ट्र

Aditya Thackeray : भाजपला आदित्य ठाकरेंच्या सल्ल्याची गरज नाही, त्यांनी फडणवीसांवर विश्वास ठेवावा!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai political News : हिवाळी अधिवेशनात शिवसेना (शिंदे गट) सह भाजपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांचे सरकार अनैतिक आहे. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. भाजपने त्यांचा पाठींबा काढून घ्यावा, असे सल्ला शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इतर राज्यात मुख्यमंत्री नेमण्यास उशीर होत असल्याबाबत देखील आदित्य ठाकरे बोलले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करत मुख्यमंत्री कोण असावा या संदर्भात आदित्य ठाकरेंच्या सल्ल्याची गरज नसल्याचे सुनावले.

वेगवेगळ्या मुद्यांवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. ते म्हणाले, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवायला हवा. दिशा सेलियन प्रकरणी देवेंद्र फडणवीस आकसापोटी वागणार नाहीत. तसेच नवाब मलिकांच्या बाबात फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून त्यांना महायुतीत घेऊ नये, अशी भुमिका घेतली.

फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार यांनी देखील आपली भुमिका स्पष्ट केली. तर, विरोधी पक्षांकडून नवाब मलिक नको म्हणत असताना प्रफुल पटेल कसे चालतात? असा सवाल उपस्थित करून देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर स्पष्टकरीन देताना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भुमिकेचे भाजपकडून अभिनंदन केले आहे. त्यांची ही भुमिका भाजपमध्ये सर्वांनाच मान्य आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उभा राहत असल्याचे चित्र आहे. सरकारमध्ये मंत्री असणारे छगन भुजबळ हे एल्गार सभांच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. छगन भुजबळ यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे सरकार अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर भाष्य करताना छगन भुजबळांवर विश्वास व्यक्त करत त्यांच्या वक्तव्यापासून सरकार अडचणीत येणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस नेते नाना पटोले हे सरकारला धारेवर धरत आहेत. सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना नाना पटोले लक्ष्य करत आहेत. त्यावर पटोलेंवर टिका करत बावनकुळे म्हणाले, माध्यमांवर सतत चमकत राहण्यासाठी काही लोक काहीही विधान करत असतात. देवेंद्र फडणवीस यांना उठून कुणीही बोलेल तर त्यावर जनता विश्वस ठेवणार नाही. देवेंद्र फडणवीस हे जनेतेचे नेते आहेत.

संजय राऊत हे आपल्या सभांमधून भाजपवर टिका करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी खुले आव्हान देत ते पुन्हा सत्तेत येणार नाही, असे म्हटले आहे. भाजप नेत्यांवर टिका करताना नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यमुळेच गुजरातच्या मुख्यमंत्री पदी कायर राहिले, याची आठवण राऊत करून देत आहेत. संजय राऊतांच्या टिके विषयी बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांच्या विषयी आम्ही काही बोलावे असे नाही. त्यांच्यावर नितेश राणे बोलतील.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT