Gopichand Padalkar : इंदापुरातील घटनेनंतर पडळकरांचा इशारा; म्हणाले, 'त्यांच्या अंगावर कपडेही...'

Dhangar Reservation : नागपूर अधिवेशनावर ११ डिसेंबर रोजी धनगर समाजाचा मोर्चा
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarakranama
Published on
Updated on

Maharashtra Political News : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये शनिवारी ओबीसांचा महाएल्गार सभा झाली. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी दूधदरांबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. आंदोलकांना भेटण्यापूर्वी पडळकांच्या वाहनांवर चप्पलफेकीचा प्रकार घडला. हा भेकड हल्ला होता. चप्पलफेकीचा सूत्रधार कोण, हे मला माहिती आहे. मी संयमाने वागलो नसतो तर त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, अशा कडक शब्दात पडळकरांनी संबंधितांचा समाचार घेतला आहे.

राज्यात आरक्षण मिळवण्यासाठी मराठा तर आरक्षण बाचावासाठी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच इंदापूरमध्ये दूधला सरकारने घोषित दिलेल्या दर मिळावा, यासाठी अण्णा काटे आंदोलन करत आहे. ओबीसी महाएल्गार सभेला उपस्थित राहण्यापूर्वी पडळकर काटेंच्या भेटीला जात होते. त्यावेळी त्यावेळी घोषणाबाजी करत काहींनी पडळकरांच्या वाहनावर चप्पल फेकली. या प्रकारामुळे सभेत मंत्री छगन भुजबळ आणि पडळकर आक्रमक झाल्याचे दिसले.

Gopichand Padalkar
Dr. Padmsingh Patil : बेधडक अन् निडर; डॉ. पद्मसिंह पाटलांचा थरारक राजकीय प्रवास...

या हल्ल्यानंतर पडळाकांनी चप्पलफेकीमागील सूत्रधार कोण आहे, ते माहिती असल्याचा दावा केला. तसेच संबंधितांना इशारा देताना गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, 'ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंधे आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडत आहे. इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत यासाठी सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. त्यानंतर त्या भेकड लोक माझ्याच कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा दावा करतात. मला त्यांची खरोखर कीव वाटते.'

Gopichand Padalkar
Manoj Jarange: भुजबळांनी माझा धसका घेतलाय, सध्या झोपेतही ते बरळतात...

'गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची भूमिका वारंवार स्पष्ट केले आहे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरे जाळतात, तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते, की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे,' असा आरोपही पडळकांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या समाजकंटकांना इशारा देत पडळकांनी ओबीसी समाजाला संयम राखण्याचे आवाहनही केले आहे. पडळकर म्हणाले, 'चप्पलफेकीनंतर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो, आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी.'

'आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा,' असेही आवाहन पडळकरांनी केले.

(Edited Sunil Dhumal)

Gopichand Padalkar
Ravilant Tupkar: तुपकरांचा सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम; केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com