Uddhav Thackeray, Chandrashekhar Bawankule sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : ''... तर देवेंद्र फडणवीस '100 कोटी वसुली फाईल्स' चित्रपट काढतील'', उद्धव ठाकरेंना बावनकुळेंचे प्रत्युत्तर

Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा,असे आवाहनच बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

Roshan More

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावकर' चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांनी राहुल गांधी हा सिनेमा पाहणार असतील तर त्यांच्यासाठी संपूर्ण सिनेमागृह बूक करायला तयार असल्याचे म्हटले. त्यावर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या महारॅलीला गेलेल्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला .देवेंद्र फडणवीसांचा खर्च मी करायला तयार आहे. त्यांनी एखादा चित्रपट निर्माता घेऊन मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असा टोला लगावला. उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी चित्रपट काढायचे ठरवले तर '100 कोटी वसुली फाईल्स'ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय 'वाझे की लादेन फाईल्स', 'खिचडी फाईल्स', 'कोविड बॅग फाईल्स' असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा, असे टोला बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

दिल्लीत झालेल्या इंडीया आघाडीच्या महारॅलीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'ठगो का मेला' असे संबोधले. मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित 'ठगो का मेला' कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला, असे म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले.

तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात पराभूत करू असे आवाहनच बावनकुळे यांनी ठाकरेंना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT