Uddhav Thackeray News : "तुमच्या जाण्यायेण्याचा अन् हॉटेलचा खर्च मी करतो, फक्त...", ठाकरेंचं फडणवीसांना थेट आव्हान

Uddhav Thackeray On arvind Kejriwal : "निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली. कारण...", असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

देशातील हुकूमशाहीविरोधात एक होण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढाकार घेतला होता. नेमकं निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन ( Hemant Soren ) आणि अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली. याचा अर्थ देशात हुकूशाही आल्यातच जमा आहे, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केला आहे. भाजपनं अनेकांना पक्षात घेऊन त्यांचे केसेस बंद केल्यात. जे विरोधात बोलतात त्यांच्यावर केसेस दाखल करून तुरुंगात टाकलं जातं. हे लोकशाहीसाठी चांगलं लक्षण नाही, अशी काळजी ठाकरेंनी व्यक्त केली.

अरविंद केजरीवालांच्या ( Arvind Kejriwal ) अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत 'इंडिया' आघाडीनं महारॅलीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) दिल्लीत दाखल झालेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) सुद्धा उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बायकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत"

"काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकर चित्रपट पाहणार असतील, तर मी माझ्या पैशानं सिनेमागृह बुक करेन," असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिलं होतं. या विधानाचा उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) समाचार घेतला. "फडणवीसांच्या जाण्यायेण्याचा, हॉटेलचा खर्च मी करतो. फक्त त्यांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जाऊन यावं. दार्जिलिंग, अरूणाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये जाऊन पंडिताना भेटावं. बायकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत. त्यामुळे एखादा प्रोड्यूसर घेऊन 'मणिपूर फाइल्स' हा चित्रपट फडणवीसांनी काढावा," असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचीही वाटचाल केजरीवालांच्या दिशेने?

"जनता निवडणुकीची वाट पाहतेय"

"महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. गद्दारी करून सरकार स्थापन केल्याचा राग सगळ्यांच्या मनात राग आहे. चित्रविचित्र सोबती घेण्याचं काम सुरू असून जनता निवडणुकीची वाट पाहत आहे," उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"निवडणूक रोख्यांचा मोठा लाभार्थी भाजप"

'महारॅलीवर ठगो का मेला,' अशी टीका भाजपनं केली होती. याबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपकडे असलेल्या ठगांवरील केसेस मागे घेण्यात येत आहेत. निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली. कारण, सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे. अनेक कंपन्यांवर धाडी टाकल्यानंतर भाजपला निवडणूक रोखे मिळाले. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलीत करण्यासाठी केजरीवालांना अटक करण्यात आली. भ्रष्टाचाऱ्यांना बरोबर घेऊन युती पुढे नेण्यात येत आहे, याला नैसर्गिक युती म्हणायची का?"

"आम्ही ठगमुक्त झालो आहोत"

'ठग'वरून संजय राऊत यांनीही भाजपला लक्ष्य केलं. "राष्ट्रवादीतील सगळे मुख्य ठग भाजपकडे गेल्यानं त्यांचा पक्ष मोकळा झाला आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल हे ठग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते. आमच्याकडील ठग भाजपने घेतल्यानं, आम्हीही ठगमुक्त झालो आहोत," अशी टोलेबाजी संजय राऊतांनी केली आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : राहुल गांधी जेथे-जेथे गेले, तेथे काँग्रेस फुटली !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com