Chandrashekhar bawankule News: 'मतांच्या राजकारणासाठी ठाकरेंनी पत्कारली लाचारी' ; चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र!

India Alliance and Chandrasekhar Bawankule : इंडिया आघाडीचा प्रभाव नाही, महायुती महाराष्ट्रात हमखास 45 प्लस जागा जिंकणार
Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Uddhhav Thackrey: उद्धव ठाकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली होती. त्यामुळे त्यांचे 18 खासदार विजयी झाले. यंदा त्यांनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाला दिले आहे.

'इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीसारखी केली नाही. मतांच्या राजकारणासाठी ठाकरे लाचार झाले आहेत. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून ते बसले होते. हिंदू आणि ओबीसींचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींना ते शरण गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात यापुढे त्यांना फारसे महत्त्व राहणार नाही.', असे देखील बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Eknath Shinde News : मुंबईतील सभा फ्लॉप, ते फॅमिली गॅदरिंग; शिंदेंनी उडवली आघाडीची खिल्ली

इंडिया आघाडीच्या मेळाव्याचा येत्या लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभाव पडणार नाही, या आघाडीच्या मेळाव्यातील भाषणे हा मनोरंजनाचा विषय होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे यांचे भाषण म्हणजे हास्यजत्रा होती. त्यांच्या भाषणात विकासाबद्दल काहीही व्हिजन नव्हते. केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचे काम त्यांनी केले. असे देखील बावनकुळे म्हणाले.

याचबरोबर शरद पवार(Sharad pawar) यांचावर सुद्धा बावनकुळे यांनी टीका केली. आगामी लोकसभा निवडणुकीत पवार एकट्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अडकून पडतील. या मतदारसंघाबाहेर ते जाऊ शकणार नाहीत. एक परिवार, एक मतदारसंघ यामध्ये ते अडकले आहेत.

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Girish Mahajan on Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या उमेदवारीवर महाजनांचे सूचक वक्तव्य; त्यांचे तिकीट नाकारण्याचा विषयच...

येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात 45 हून अधिक जागा मिळतील. महाराष्ट्राच्या जनतेत देखील तसेच वातावरण आहे. येत्या एक-दोन दिवसात महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवार जाहीर होतील. आमची लढाई 51 टक्के मतांसाठी आहे. अन्य कुणाला संपवण्यासाठी नाही. महायुती यंदा महाराष्ट्रात क्रांती घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com