Mumbai News : राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून विविध घटनांमुळे तापलेले आहे. त्यातच भाजप व विरोधी पक्षाच्या नेत्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः भाजपच्या काही नेत्याकडून आरोप कीर्त असताना व संवेदनशील प्रकरणावर बोलतांना बेजबाबदार वक्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावरून भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमधील नेत्यांना कडक शब्दात तंबी दिली आहे.
संवेदनशील प्रकरणावर बोलतांना नवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारेखान, विजय वडेट्टीवार यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. परतवाडा सारख्या संवेदनशील प्रकरणावर बोलतांना भाजपमधील माजी खासदार नवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारे खान यांनी बेजबाबदार वक्तव्य करू नये, असा इशारा दिला आहे.
अमरावतीच्या परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्याबद्दल दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावरून राज्याचं राजकारण देखील तापलं आहे. या प्रकरणावर बोलताना भाजप (BJP) नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी नवनीत राणा या जातीय विष पसरवण्यासाठी पोसलेली विषवल्ली असल्याचे म्हटले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या एकेरी भाषेतल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनीत राणा यांनी वडेट्टीवार यांना 'हे चिल्लर लोक असल्याची टीका केली. त्यामुळे काँग्रेसविरुद्ध भाजप असा संघर्ष समोर आला आहे. त्यामुळेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawnkule) यांनी भाष्य करत पक्षातील नेत्यांना तंबी दिली.
परतवाडा सारख्या संवेदनशील प्रकरणावर बोलतांना कोणीच बेजबाबदार वक्तव्य करू नये. पोलिसांकडून अधिकृत माहिती घेवूनच या विषयावर बोलावे. माझी सर्वांना विनंती आहे की अमरावतीचे आनंदाचे वातावरण दूषित करू नये. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलीस तपासात आणखी अधिकृत माहिती दिली जाईल. असेही अमरावतीचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यवतमाळमधील मुली बेपत्ता होत असल्याच्या प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना आहे. विदर्भातला विषय असल्याने या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातले आहे. मी देखील जातीने लक्ष घालणार आहे. आदिवासी मुलींचा विषय आहे. आमचे आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी या संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष घातले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.