

Mumbai News : राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या तीन महिन्यात पार पडल्या आहेत. त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील 17 जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासोबतच राज्यातील विधानसभा सदस्यातून निवडून देण्याच्या 9 जागांची मुदत 17 मे ला संपणार आहे. तर प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने आता येत्या तीन महिन्यात महाराष्ट्राला तब्बल 27 नवीन आमदार मिळणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून चाचपणी केली जात असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागा रिक्त आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अधिककाळ रिक्त असलेल्या या जागा स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदार नसल्याने रिक्त होत्या. मात्र, राज्यातील नगरपालिका, महापालिका व 12 जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत. तर उर्वरित 20 जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे झालेल्या नाहीत. त्यामुळे येत्या काळात या जागा रिक्त राहणार असे वाटत असतानाच आता एका नियमाने हे समीकरण बदलणार आहे
येत्या तीन महिन्यात या रिक्त असलेल्या 17 जागावरील निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने या जागांवरील मतदाराची माहिती मागवली असून ७५ टक्केपेक्षा अधिक मतदार असल्यास या निवडणुका होऊ शकतात, यास निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणच्या निवडणुकाचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच लवकरच विधानसभा सदस्यातून निवडून देण्याच्या ९ जागांची मुदत १७ मे ला संपणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसातच या ठिकाणच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महायुतीमधील भाजपला पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवृत्त होणार असल्याने या जागेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच काँग्रेसच्या (Congress) नेत्या प्रज्ञा सातव यांनी तीन महिन्यापूर्वी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर येत्या काळात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर येत्या काळात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली तर दहा जागासाठी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
येत्या 3 महिन्यात या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता येत्या तीन महिन्यात महाराष्ट्राला तब्बल 27 नवीन आमदार मिळणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून चाचपणी केली जात असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.