Chhagan Bhujbal and Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले मला दोन नेते आदरस्थानी, एक 'शरद पवार' अन् दुसरे..,

Chhagan Bhujbal Respect for Sharad Pawar & Balasaheb Thackeray : छगन भुजबळ म्हणाले, दोघांपासूनही खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्यासोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली तरी अजित पवार यांच्यासह दोन्ही गटांचे नेते अनेकदा शरद पवार हेच आपले दैवत असल्याचे वारंवार सांगत असतात. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार कालही माझे दैवत होते, आजही आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता आमदार छगन भुजबळ यांनीही शरद पवार हे आपल्या आदरस्थानी आहेत असे म्हटले आहे.

छगन भुजबळ यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही आदरस्थानी असल्याचे म्हटले आहे. आजवर राष्ट्रवादीचे नेते जेव्हा जेव्हा अशाप्रकारे शरद पवार यांच्याविषयी आदरयुक्त बोलले आहेत तेव्हा तेव्हा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या आहेत.

भुजबळ म्हणाले माझे भाग्य आहे की, 25 ते 27 वर्षे मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता मिळाला. त्यांच्यासोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. सांगायचं तर मी मी त्यांचा उजवा हात होतो. त्यानंतर मला शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला. दोन्ही नेते हे मोठे नेते आहेत. या दोघांपासूनही खूप काही शिकायला मिळालं. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार दोघांप्रती आपल्याला आदर असल्याचं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, राजकीय वाटचालीत नक्की कोण कुणाचा प्रतिस्पर्धी आहे हे सांगणे कठीण असते. एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांच्या उरावर बसणे या गोष्टींना राजकारणात रोजच सामोर जावे लागते. कोण कोणाला धोबी पछाड देईल हे सांगता येत नाही. कुस्तीप्रमाणे राजकारणातल्या आखाड्यातही डावपेच आणि प्रतिडाव सुरु असतात असे मत आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे एका सभेत भाषण केले होते. या भाषणात त्यांनी शरद पवार यांच्याविषयी भाष्य केले. ते म्हणाले, आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. परंतु, आज भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा खंभीर नेता मिळाला आहे. आज त्यांच्या पाठिशी उभे राहुन देशाची प्रगती करुन घेणं गरजेचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT