Narendra Darade : प्रशासनाचा सावळा गोंधळ, कार्यकाळ संपलेल्या नरेंद्र दराडेंना करुन टाकलं आमदार

Nashik District Bank Meeting : जिल्हा बॅंकेच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी लोकप्रतिनिंधीना आमंत्रित करण्यात आलं आहे.
Narendra Darade
Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : थकबाकीदारांच्या मुद्यावरुन राज्यभरात चर्चेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी शुक्रवारी (ता.11) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपलेल्या माजी आमदार नरेंद्र दराडे यांना या बैठकीसाठी आमदार म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

जिल्हा बॅंकेच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी लोकप्रतिनिंधीना आमंत्रित करण्यात आलं आहे. येवल्याचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपून आता एक वर्ष होत आले आहे. तरीही आमदार म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आल्याने प्रशासनाच्या लेखी नरेंद्र दराडे अद्याप आमदारच असल्याचं दिसतं.

Narendra Darade
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांनी बंद केली धनंजय मुंडेंची 'ती' प्रथा!

विशेष म्हणजे याआधीही एकदा प्रशासनाकडून असाच गोंधळ झाला होता. यापूर्वी एका शासकीय दौऱ्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर काही तासांसाठी पालकमंत्रीपदाचा कार्यभार प्रशासनाने सोपविला होता. त्यावेळी अधिकृत पालकमंत्रीपदाची घोषणाही झाली नव्हती. आताही विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा कार्यकाळ २१ जून २०२४ रोजीच संपला आहे. मात्र बैठकीच्या पत्रात त्यांना आमदार म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे.

या बैठकीसाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनाही उपस्थित राहण्यासाठी संदेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र सर्वांना पाठवण्यात आले आहे.

Narendra Darade
Eknath Khadse Politics: धक्कादायक, ३०० कोटींचा 'आरटीओ' घोटाळा; खडसेंचा थेट फडणवीसांना प्रश्न!

कधीकाळी सहकार क्षेत्रात चांगला दबदबा निर्माण करणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वाढत्या थकबाकीमुळे संकटात सापडली आहे. त्यातील बड्याथकबाकीदारांमध्ये काही राजकीय व्यक्तीचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेकडून वसुली करत असताना या बड्या थकबाकीदारांना अभय देऊन छोट्या थकबाकीदारांवर कारवाई होत असल्याचे चित्र असून त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा सर्व परिस्थित कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत काय निर्णय होता व काय निष्पन्न होतं ते पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com