Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Challenge Manoj Jarange : छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना चॅलेंज, हिंमत असेल तर...

Roshan More

Maratha Aarakshan : मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने अधिसूचना काढली. अधिसूचनेतून 'सगेसोयरे' शब्दावर तोडगा काढल्याने मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सरकारच्या अधिसूचने विरोधात छगन भुजबळ ठिकठिकाणी ओबीसींच्या सभा घेणार आहेत. तसेच मनोज जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करणार आहेत. छगन भुजबळ यांनी थेट मनोज जरांगे यांना चॅलेंज दिले आहे.

मागच्या दाराने कुणबी दाखले दिले जात असून ओबीसींवर अन्याय केला जात आहे. हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या, असे थेट चॅलेंज भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांना दिले. मनोज जरांगे यांना लाख आणि कोटीमधील फरक कळत नाही, असे म्हणत भुजबळ यांनी जरागेंची खिल्ली उडवली. (Chhagan Bhujbal Challenge Manoj Jarange)

मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? यावर भुजबळ यांना विचारले असता 'नो कमेंट' एवढेच उत्तर भुजबळ यांनी दिले. मुंबईत तीन कोटी मराठे आणणार असल्याचा दाव मनोज जरांगे यानी केला होता. त्यावरदेखील भुजबळ यांनी मत व्यक्त केले. तुम्ही पाहिलेच असेल किती जण आले होते ते. त्यांना लाखातला आणि कोटीतला फरक कळत नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांचे नाव न घेता भुजबळ यांनी खिल्ली उडवली. ते जातीसाठी लढताहेत आणि मी वर्गासाठी लढतोय, असे सांगत ओबीसींच्या 350 जातींसाठी आपला लढा असल्याचे भुजबळ म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विजयी उन्माद...

गावागावात विजयी मिरवणुका काढल्या जात आहेत. या मिरवणुकांमधून ओबीसी समाजाला त्रास दिला जातोय. विजय साजरा करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, उन्मादी उत्सव सुरू आहे. रात्री तीन वाजेपर्यंत डीजे लावून नाच करायचा. ओबीसी घरे आहेत त्यांना त्रास देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला. गावात दोन तीन घरे असणारे ओबीसी घरे सोडत असल्याचा दावादेखील भुजबळ यांनी केला आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT