Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : 'अंतरवाली सराटीत 84 पोलिसांना चोपलं, अ‍ॅडमीट झाले...', मंत्री भुजबळांचा 'त्या' घटनेविषयी धक्कादायक दावा

Chhagan Bhujbal Police Antarwali Sarati : मनोज जरांगे पाटील यांचे जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरु होते तेव्हा पोलिसांनी महिलांना मारल्याचा आरोप केला जात होता. मात्र,वास्तव वेगळेच असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

Roshan More

Chhagan Bhujbal News : तीन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यावेळी महिलांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ समोर आले होत. त्या घटनेचा उल्लेख करत मंत्री छगन भुजबळ यांनी 'साम टिव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक दावा केला.

भुजबळ म्हणाले की, 'खरं म्हणजे झालं असं की, त्याला (मनोज जरांगे) उठवण्यासाठी पोलिस गेले तिथे. त्याने सांगितले की आता ता नाही नंतर येतो. त्याच्या आवतीभोवती महिलासुद्धा होत्या. त्यामुळे महिला पोलिस पण तेथे गेल्या. आणि अगोदरच ठरल्याप्रमाणे जे पोलिस तेथे गेल्यानंतर प्रचंड दगडफेक त्यांच्यावर झाली. 84 पोलिस, महिला पोलिसांच्यासहीत अॅडमीट होते. जाऊन रेकाॅर्ड पाहा.'

'पोलिस लोकांच्या घरामध्ये शिरायचे संरक्षणासाठी पण त्यांना घराच्या बाहेर ढकलून द्यायचे. आणि त्यांना चोपायचे. मग हे झाल्यानंतर पोलिसांनी लाठी चार्जची ऑर्डर दिली.', असे देखील भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'पहिल्या एक-दोन दिवसात सगळं दाखवला गेलं, नंतर फक्त दाखवलं गेलं की लोकांना खूप मारलं पोलिसांनी. त्यातून जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली त्याती हे सगळं मोठ झालं.'

मनोज जरांगेंना अटक का नाही?

छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्यानंतर मुलाखतीमध्ये त्यांना येवढं सगळं घडलं तर मग जरांगेंना अटक का केली नाही? असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले,'मी स्वतः मुख्यमंत्र्यांना बोललो की ही तुमच्या एसपीची चूक आहे. त्याने मीडियासमोर येऊन सांगायला पाहिजे होते की माझे येवढे पोलिस जखमी झाले आहेत. त्यामुळे हे आम्हाला करावं लागलं. बरं त्यांनी नाही केलं. तुम्ही होम मिनीस्टर आहात, तुम्ही बोलायला पाहिजे होते, की ही तुमची चूक आहे. त्यामुळे एकतर्फी माहिती लोकांच्यापुढे गेली आणि खरी माहिती पुढे आली नाही.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT