Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: भुजबळांचा खळबळजनक आरोप; म्हणाले,"अंतरवाली सराटीतील दगडफेकीच्या प्लॅनवेळी पवारसाहेबांचा आमदार...

Maratha Vs OBC : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता.18) नागपूरमध्ये समता परिषदेच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसेच खळबळजनक दावे केले आहेत.

Deepak Kulkarni

ठळक मुद्दे:

  1. अंतरवाली सराटी आंदोलनातील दगडफेकीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर आरोप करत सांगितले की हा प्लॅन आदल्या रात्रीच ठरवला गेला होता आणि एका आमदाराचीही यात सहभाग होता.

  2. भुजबळांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर वस्तुस्थिती माहित असूनही आंदोलनस्थळी जाण्याचा आरोप केला, तसेच देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

  3. जरांगे यांच्या आंदोलनावरून केलेल्या या दाव्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Nagpur News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीतील मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनात पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटला. आता या दगडफेकीवरुन मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) आजपर्यंतचा गंभीर आरोप केला आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता.18) नागपूरमध्ये समता परिषदेच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसेच खळबळजनक दावे केले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, अंतरवाली सराटीतील 83 पोलिसांवर दगडफेक झाली. त्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला. त्यावेळेस पवारसाहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहित असतानाही, शरद पवार (Sharad Pawar) त्या ठिकाणी गेले,असा गौप्यस्फोट करुन भुजबळांनी खळबळ उडवून दिली आहे.

छगन भुजबळ यांनी यावेळी मात्र,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला ते म्हणाले, मंत्रिमंडळात सध्या एकमेव आशेचा किरण आहे तो म्हणजे, देवेंद्र फडणवीस. त्यांनी ओबीसी समिती दिली, समाजाला निधी दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांनी आता थेट जुना पण मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु ठरलेल्या अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरुन दावा केल्यानं राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. अंतरवाली सराटीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक महिलांसह लहान मुलेही जखमी झाले होते. पण त्यानंतर उपस्थित जमावानं पोलिसांवर दगडफेक केली होती.

भुजबळ म्हणाले, निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो. त्यामुळे जो जो जरांगेला पाठिंबा देतो, त्याला निवडणुकीत धडा शिकवा. जर तुम्ही एकत्र आलात, तर काहीही अशक्य नाही. माझ्या निवडणुकीवेळी जरांगे दोन दिवस आला. मला मराठ्यांची मतं मिळाली नाहीत. पण ओबीसी, एसटी, एससी आणि सर्व जाती माझ्या सोबत आल्या,म्हणून मी जिंकल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

प्र.१: छगन भुजबळांनी कोणता गंभीर आरोप केला?
उ.१: अंतरवाली सराटीतील दगडफेक पूर्वनियोजित होती आणि एका आमदाराचा यात सहभाग होता, असा आरोप भुजबळांनी केला.

प्र.२: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भुजबळांनी काय म्हटलं?
उ.२: त्यांना वस्तुस्थिती माहित असूनही शरद पवार आंदोलनस्थळी गेले, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

प्र.३: भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय भूमिका घेतली?
उ.३: त्यांनी फडणवीस यांना "एकमेव आशेचा किरण" म्हणत ओबीसी समिती व निधी देण्यासाठी कौतुक केले.

प्र.४: राजकीय वातावरण का तापण्याची शक्यता आहे?
उ.४: जरांगे यांच्या आंदोलनावरुन थेट आरोप झाल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि निवडणूक समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT