Madhubhai Kulkarni Death: संघाचा झुंजार प्रचारक हरपला, मधुभाई कुलकर्णींचं निधन; मोदींना राजकारणात आणण्यात मोलाची भूमिका

RSS Leader Madhubhai Kulkarni Passes Away: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधूभाई कुलकर्णीं यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकारणात पाठवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
Madhubhai Kulkarni Narendra Modi
Madhubhai Kulkarni Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचं गुरुवारी(ता.18) दुपारी साडेबारा वाजता निधन झालं आहे. त्यांनी 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना राजकारणात आणण्यात त्यांचा महत्त्वाचा योगदान राहिलं होतं.

मधुभाई कुलकर्णी यांचा जन्म 17 मे 1938 रोजी झाला होता. त्यांना लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाण्याची ओढ लागली. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीतील अनेक चढउतार पाहिले. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी संघाच्या समर्पण कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. आत्तापर्यंत भय्याजी जोशी, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) ज्येष्ठ प्रचारक मधूभाई कुलकर्णीं यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकारणात पाठवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांना गुजरातमध्ये प्रांतप्रचारक म्हणून 1985 मध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी संघ प्रचारक असलेले नरेंद्र मोदींना भाजपमध्ये पाठवलं होतं. यानंतर नरेंद्र मोदी सर्वाधिकवेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. 2014 च्या निवडणुकीत देशात सत्तापरिवर्तन घडलं.यात मोदींना पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली आहे.

Madhubhai Kulkarni Narendra Modi
SEBI On Hindenberg: 'सेबी'चा 'हिंडेनबर्ग'ला दणका, अदानी समूहाला मोठा दिलासा; स्टॉक मॅनिप्युलेशनचे सर्व आरोप फेटाळले

बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे जन्मलेल्या मधुभाई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सोपवण्यात आलेल्या विभाग, प्रांत, क्षेत्रीय प्रचारक यांसारख्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांचं वास्तव्य काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे होते. त्यांनी मृत्यूनंतर देहदान केले आहे. त्यांचे पार्थिव रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आर. के. दमाणी वैद्यकीय महाविद्यालयास सायंकाळी सोपवण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com