Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Merger News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा 'सस्पेन्स' भुजबळांनी फोडला! निर्णय कोण घेणार? याबाबत सगळंच सांगितले

Chhagan Bhujbal's statement News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सर्व तपास यंत्रणांचे अहवाल आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळण्यात येत असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

मुंबई आणि पुण्यात मफलरवाला कोण?' अशा आशयाचे बॅनर झळकल्याबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सर्व तपास यंत्रणांचे अहवाल आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. मात्र, लोकशाहीमध्ये कोणालाही काहीही करता येते. त्याला आपण रोखू शकत नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सर्वांत जवळच्या व्यक्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी आणि आई यांनी व्यक्त केलेल्या भावना महत्त्वाच्या आहेत. या प्रकरणाचे राजकारण करण्यात येऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना भुजबळ म्हणाले, दोन्ही पक्षांकडून बैठका आणि चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्येकाने स्वतंत्रपणे चर्चा करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच, या प्रक्रियेत तिसरा घटक असलेल्या एनडीएचा विचार करणेही आवश्यक आहे. त्यानंतरच पुढील पाऊल टाकणे शक्य होईल.

विलिनीकरणाबाबत बैठका झाल्या आणि या चर्चांसाठी आम्हाला निमंत्रित केले, तर निश्चितच आम्ही सहभागी होऊ, असेही भुजबळ यांनी सांगितले. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जोपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय घेतलेला नाही, तोपर्यंत कितीही चर्चा झाल्या तरी त्यातून यश मिळणार नाही, असे स्पष्ट करत भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या निर्णयाची चावी सुनेत्रा पवार यांच्या हाती असल्याचे सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT