Prashant Bamb TET exam Sarkarnama
महाराष्ट्र

Prashant Bamb TET exam : प्रशांत बंब यांना शिक्षकांच्या 'TET' परीक्षेबाबत वेगळाच संशय; फेरफार, गुणांमध्ये छेडछाड अन् बोगस प्रमाणपत्रांची शक्यता!

BJP MLA Prashant Bamb Raises Suspicion Over TET Exam in Chhatrapati Sambhajinagar : देशातील प्रत्येक शिक्षकाने पुढील दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बंधनकारक आहे.

Pradeep Pendhare

TET exam suspicion Maharashtra : सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन वर्षांत देशातील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रात शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा घेतल्या जात आहेत.

पण भाजप आमदार प्रशांत बंब यांना, या परीक्षांबाबत वेगळाच संशय आहे. परीक्षेच्या निकालाबाबत फेरफार होऊ शकते, अशी शंका प्रशांत बंब यांनी उपस्थित केली आहे. प्रशांत बंब यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिलं आहे.

शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam) फेरफार होऊ नये यासाठी कार्बन प्रत अन् गुणांची जिल्हा परिषदेमार्फत पडताळणी अनिवार्य करण्याची मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे. वर्ष 2018-19 मध्ये टीईटी परीक्षेत घोटाळा झाला होता. तो पुन्हा होण्याची शक्यता आहे, असा संशयही प्रशांत बंब यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य परीक्षा परिषद आयुक्तांना दिलेल्या निवेदनात प्रशांत बंब यांनी म्हटले आहे की, ‘वर्ष 2018-19 मध्ये काही शिक्षकांनी लाखो रुपयांची देवाणघेवाण करून बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती. त्यातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याच मार्गाने काही मंडळी गैरप्रकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.'

तसंच, '23 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. त्यामुळे गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी परीक्षार्थींकडे असलेली ओएमआरची कार्बन प्रत सुरक्षित ठेवणे बंधनकारक करावे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांकडून कार्बन प्रत आणि गुणांची जिल्हा परिषदेमार्फत पडताळणी करूनच अंतिम प्रमाणपत्र द्यावे’, अशीही मागणी प्रशांत बंब यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार प्रशांत बंब म्हणाले, "कार्बन प्रत पडताळणी व्यवस्था लागू केल्यास टीईटी परीक्षेतील फेरफार, गुणांमध्ये छेडछाड आणि बोगस प्रमाणपत्रांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. ही प्रक्रिया काटेकोरपणे अमलात आली, तरच तिचा प्रत्यक्ष परिणाम दिसेल. येत्या 23 नोव्हेंबरला परीक्षा होणार असून, आता प्रशासनाने कठोर पावले उचलणे भाग आहे. पारदर्शकता टिकली नाही, तर पुन्हा एकदा संपूर्ण शिक्षण यंत्रणेवर संशयाची छाया दाट होईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT