Prashant Bamb controversy Sarkarnama
महाराष्ट्र

Prashant Bamb controversy : शिक्षकांना डिवचणाऱ्या आमदार बंबांवर भाजपचा पदाधिकारी भडकला; ...तर काळ फसणार!

BJP MLA Prashant Bamb Faces Warning from Teachers Front Over Suspension Demand : भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांना निलंबनाची मागणी केली आहे.

Pradeep Pendhare

School shutdown movement Maharashtra : राज्यातील शिक्षकांच्या संघटनांनी पाच डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनात प्राथमिकचे 21,477 आणि माध्यमिक शाळेतील 2539 शाळेतील एकूण 96 हजार 800 शिक्षक सहभागी झाले होते. या शिक्षकांवर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून एक दिवसांचे वेतन कापण्याची कारवाई होणार आहे.

यावर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांचे वेतन कापण्यापेक्षा थेट निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी केली. यावरून आमदार बंब यांच्या या विधानावर भाजपचीच शिक्षक आघाडी संतापली आहे. भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर यांनी शिक्षकांविषयी आमदार बंब यांनी विधानं करण्याचं न थांबवल्यास शिक्षक रस्त्यावर उतरून थेट काळ फासतील, असा इशारा दिला आहे.

भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) राज्यातील शिक्षकांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात ओळखले जातात. यातून अनेकदा वाद देखील उद्भवला आहे. शिक्षकांना “लाडावलेले” संबोधत संपाच्या काळात वेतन कपात करण्याची आणि गरज भासल्यास “निलंबित करण्याची” मागणी करत प्रशांत बंब यांनी वाद निर्माण केला आहे.

प्रशांत बंब यांच्या या वक्तव्याचा संताप आता भाजपच्या शिक्षक आघाडीमध्येही उसळला आहे. भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर यांनी आमदार बंब यांना थेट इशारा दिला आहे. शेखर भोयर म्हणाले, “चार फुटाचे आमदार प्रशांत बंब हे शिक्षण (Education) व्यवस्था घडवणाऱ्या शिक्षकांविषयी सातत्याने अर्वाच्य भाषा वापरतात. शिक्षक देशाची पिढी घडवतात, आणि दोन-तीन टक्के लोकांच्या गैरवर्तनावरून संपूर्ण समाजाला वाईट ठरवणे अयोग्य आहे."

आमदार बंब यांना काळ फासण्याचा इशारा

शेखर भोयर यांनी थेट इशारा देत म्हटले की, यापुढे शिक्षकांविषयी शिवराळ, अर्वाच्य भाषा वापरली, तर शिक्षक रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच भाजपचे आमदार बंब यांना हा इशारा दिल्याने भाजपतंर्गत राजकीय वाद उफळण्याची शक्यता आहे.

शिक्षकांच्या या प्रमुख मागण्या

शालेय शिक्षण विभागाने काढलेला 15 मार्च 2024 चा सरकारचा निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांसाठी टीईटी (TET Exam)अनिवार्यता केली जाऊ नये या प्रमुख मागणीसाठी राज्यातील विविध शिक्षक, मुख्याध्यापक आधी संघटनांकडून 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केलं होतं.

96 हजार शिक्षकांचे वेतन कपात

राज्यातून एकूण 96 हजार 800 शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. या शिक्षकांवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक दिवसाची वेतन कापण्याची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. ही कारवाई शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT