Sadhugram construction stay demand : तपोवनातील वृक्षतोड, मनसेनं उभारला कायदेशीर लढा; थेट साधुग्रामला स्थगितीची मागणी

MNS Files High Court Petition to Halt Tree Cutting for Nashik Kumbh Mela Sadhugram : नाशिक इथल्या तपोवनात साधुग्राम साकारण्यासाठी नाशिक महापालिकेच्यावतीने 1,825 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव आहे.
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh MelaSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela tree cutting issue : नाशिक इथल्या तपोवनात प्रस्तावित साधुग्राम आणि प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी हजारो वृक्ष तोडले जाणार आहेत.

याविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून, साधुग्राम प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली गेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांनी जनहित याचिका केली, असून याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

नाशिक (Nashik) इथल्या तपोवनात साधुग्राम साकारण्यासाठी नाशिक महापालिकेच्यावतीने 1,825 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव आहे; मात्र यामागे वेगळेच काही कारण असल्याचा संशय व्यक्त करीत भारत मंडपमच्या नावाखाली ही जागा ठेकेदाराला देण्याचा घाट घातल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

दुसरीकडे राज्य सरकारच्या (Maharashtra) संकेतस्थळावर, साधुग्राममध्ये प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी 220 कोटी रुपयांच्या निविदा मागवल्याचे नमूद केलं आहे. माईस म्हणजेच मीटिंग इन्सेटिव्ह कॉन्फरस अँड एक्झिबिशन्ससाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, तपोवनातील झाडे तोडू नयेत, प्रस्तावित प्रदर्शनी केंद्राच्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अथवा तो रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या याचिकेत केल्या आहेत.

Nashik Kumbh Mela
India highest number of schools : जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त शाळा अन् महाविद्यालये; भारताचा कितवा क्रमांक...

भारत मंडपम; प्रस्ताव नियमबाह्य!

तपोवन ना विकास क्षेत्र घोषित केले असताना नाशिक महापालिकेने 2017मध्ये शहर विकास आराखड्यात हे क्षेत्र साधुग्राम म्हणून दाखवले होते. तसेच आता इथं भारत मंडपम साकारण्यात येणार आहे. नगररचना कायद्यानुसार आरक्षित जागेवर काहीही करण्यास मज्जाव आहे. पालिकेला आरक्षण बदलायचे असल्यास नगररचना अधिनियमाअंतर्गत फेरबदल करावा लागेल. नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवाव्या लागतील, त्यांना सुनावणी द्यावी लागते. त्यासंदर्भात प्रस्ताव राज्य सरकारच्या नगररचना विभागाकडे पाठवून त्यानंतर सरकारनिर्णय काढावा लागेल. त्यामुळे महापालिकेचा हा प्रस्ताव नियमबाह्य असल्याचा दावा याचिकेत केला आहे.

Nashik Kumbh Mela
Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदेंनी माफी मागावी..., रोहित पवार संतापले; म्हणाले, 'चुकीचंच नाही तर अनादर...'

प्रकरण काय? 54 एकरावर वृक्षतोड

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटी इथल्या तपोवनातील 54 एकर जागेवर साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1825 वृक्ष चिन्हांकित झाल्यानंतर यासंदर्भात अलीकडेच जनसुनावणी पार पडली. याचदरम्यान महापालिकेने प्रदर्शनी केंद्राच्या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या. तपोवनातील संभाव्य वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांकडून विरोध होत असून आंदोलने सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com