Mumbai news : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. उमेदवारी अर्ज माघे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने घडामोडींना वेग आला आहे. राज्यात या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे? फोडाफोडीच्या राजकारणाबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काय भावना आहे? ते या निवडणुकीत बघायला मिळणार आहे.
त्यातच महायुती लढत असलेल्या 28 मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. हे बंड रोखण्यसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. रविवारी दुपारनंतर तीन तास चर्चा झाली. त्यामध्ये बंडखोरी रोखण्यासाठी पडद्यामागे प्लॅन ठरला असल्याची चर्चा आहे.
महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आणि भाजप (Bjp) असे प्रमुख तीन पक्ष आहेत. विशेषतः महायुतीला या बंडखोरीचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे बंडोबांचं बंड थांबवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे यासाठी पडद्यामागे जोरदार घडामोडी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महायुतीमधील बंडोखोरांचं बंड थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत बंडखोरांबाबत चर्चा झाली. त्यानुसार या बैठकीत सॊमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडोबांना थंड करण्याचा प्लॅन ठरला असल्याची माहिती सूत्राने दिली.
सोमवारी कोणकोणत्या बंडखोर नेत्यांची मनधरणी घरुन त्यांचं बंड थंड करता येऊ शकते, जेणेकरुन ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, याबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. या बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होता कामा नये, अशी चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचे समजते. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.