MVA News : महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत ? उद्या दुपारपर्यंत होणार निर्णय

Political News : महाविकास आघाडी व महायुतीचे लक्ष बंडखोरी रोखण्यावर आहे. त्यातच महाविकास आघाडीत 7 ते 8 जागेवर एकमेकाविरोधात उमेदवार आल्याने या जागेवर काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागले आहे.
nana patole uddhav thackeray sharad pawar
nana patole uddhav thackeray sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीचे लक्ष बंडखोरी रोखण्यावर आहे. त्यातच महाविकास आघाडीत 7 ते 8 जागेवर एकमेकाविरोधात उमेदवार आल्याने या जागेवर काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागले आहे.

मविआतल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या घटक पक्षांने एकाच मतदार संघात दोन उमेदवार दिले आहेत. भिवंडी, परंडा, मुलुंडसह 7 ते 8 जागांवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढती होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत सोमवारी दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (MVA News )

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. महाविकास आघाडीत भिवंडी येथे रुपेश म्हात्रे यांनी बंड केले आहे. परंडा येथेही राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या विरोधात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या आघाडीतील बिघाडीबाबत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 'काही जागा या मित्र पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या. त्या जागांवर वारंवार चर्चा होऊन सुद्धा तडजोड होऊ शकली नाही. जशा शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या अनेक जागा आम्ही सोडल्या नाहीत. काँग्रेसच्या जागा ते सोडू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी कोणीही आपल्या निवडून आलेल्या जागा सोडायला तयार नव्हते. हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे.

nana patole uddhav thackeray sharad pawar
Congress News : मुख्यमंत्र्यावर अंकुश ठेवणाऱ्या काँग्रेसच्या दोन फायर ब्रँड नेत्या

भिवंडीच्या जागेविषयी आमचे माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगतात ती जागा आम्हाला मिळावी. या जागेसाठी आम्ही प्रयत्न केले. पण समाजवादी पार्टीचा विद्यमान आमदार तिकडे आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले. पण समाजवादी पार्टीने जागा सोडली नाही. अशावेळी आमच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्या दुपारपर्यंत निर्णय घेणार

महाविकास आघाडीचे सात ते आठ मतदारसंघात दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. महायुती 4-5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. महाविकास आघाडीत देखील मैत्रीपूर्ण लढत होणार का? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही मैत्रीपूर्ण लढतील पडणार नाही. महाराष्ट्रात सात ते आठ ठिकाणी दोन-दोन उमेदवार आहेत. मुलुंडच्या अधिकृत उमेदवार संगीता वाजे आहेत. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म दिला आहे. तरी तिथे काँग्रेसच्या उमेदवाराने एबी फॉर्म घेऊन अर्ज भरला. आम्ही त्यांना अधिकृत मानत नाही. असे काही ठिकाणी घडलेले असेल तर आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ असेही त्यांनी सांगितले.

nana patole uddhav thackeray sharad pawar
MVA News : पायाखालची वाळू सरकलेल्या 'या' मंत्र्याला कोण भिडणार ?

सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील

परंडा आणि अजून एक, दोन ठिकाणी दोन ए बी फॉर्म गेलेले आहेत. काही ठिकाणी गैरसमजातून घडले आहे तर काही ठिकाणी का घडले याचा आम्ही शोध घेत आहोत. काही ठिकाणी आमचे शिवसेनेच्या त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यात जुन्नर, चंद्रपूर, मुंबईत एक दोन मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीकडून काही ठिकाणी झाले आहे. काँग्रेसकडून काही ठिकाणी झाले आहे. सातत्याने आम्ही तीनही पक्षाचे नेते संवाद आणि संपर्कात आहोत. हे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

nana patole uddhav thackeray sharad pawar
Narendra Modi Vs. Mallikarjun Kharge : मोदींनी हल्लाबोल करताच खर्गेनींही 'या' मुद्द्यावरून भाजपला डिवचले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com