Manoj Jarange News : मनोज जरांगेंच्या हिटलिस्टवर 'ही' नेतेमंडळी; या ठिकाणी उभे करणार उमेदवार

Politcal News : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील काही नेतेमंडळी त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसत आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांमधील राजकीय घडामोडींमुळे ही निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंच्या पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे बघायला मिळणार आहे. त्यातच रविवारी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील काही नेतेमंडळी त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसत आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर कोणाला झटका देणार? याची चर्चा जोरात सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, कोणत्या उमेदवारांना पाडणार यासंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत. विशेष करून मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. (Manoj Jarange News)

मनोज जरांगे (Manoj Jarange) विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड, केज, जालना जिल्ह्यातील परतूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यातील पाथरी, नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदारसंघाचा समावेश आहे.

त्याशिवाय या ठिकाणचे नेतेमंडळी मनोज जरांगे यांच्या हिट लिस्टवर असल्याने या ठिकाणचे उमेदवार पाडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, हिंगोलीच्या जिल्ह्यातील कळमनुरी, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, तर लातूर जिल्ह्यातील औसा मतदार संघाचा समावेश आहे

Manoj Jarange Patil
MVA News : महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत ? उद्या दुपारपर्यंत होणार निर्णय

तर या दोन मतदार संघातील उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर राखीव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पश्चिम छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा समावेश आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी काही संभाव्य मतदारसंघाची बैठकीत नाव घेतली. गेवराई आणि आष्टीबाबतनंतर चर्चा करून बघू. तर, केज राखीवबाबत स्थानिक मराठा जे निर्णय घेतील तो निर्णय घेऊ, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राखीव मतदारसंघाबाबत 10 तारखेनंतर निर्णय घेऊ, असेही जरांगे म्हणाले

Manoj Jarange Patil
Mahayuti News : महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली; बंडखोर उमेदवार नाॅट रिचेबल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com