Eknath Shinde News
Eknath Shinde News Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde News: मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री शिंदे 'अॅक्शन मोड'वर; दिले 'हे' निर्देश

सरकारनामा ब्यूरो

Bengluru : मणिपूर मागच्या काही दिवसांपासून धगधगतं आहे. इम्फाळ येथे आदिवासी आणि बिगर आदिवासी या दोन समुदायांमध्ये अनुसूचित जमातीच्या दर्जाबाबत संघर्ष पेटला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी महाराष्ट्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारनं मोठं पाऊल उचलेलं आहे.

मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी रविवारी(दि.७) दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मणिपूर(Manipur) येथील दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील जत येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्र फिरविली आणि ऑपरेशन फत्ते झाले. या सगळ्या घडामोडीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. याचवेळी ते मणिपूर येथील हिंसाचारात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यावेशळी त्यांनी सरकार तुम्हांला सरिवोतपोरी मदत करेल आणि सर्वांना सुखरुपपणे महाराष्ट्रात आणण्यात येईल असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले, त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी देखील मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले आहेत.

लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल, असे सांगून महाराष्ट्र शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सांगलीतील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पवार मैदानात...

मणिपूर येथील दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील जत येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar)यांनी सूत्र फिरविली आणि ऑपरेशन फत्ते झाले. शरद पवार यांनी मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. तसेच संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची विनंती केली. त्यानंतर रात्री बारा वाजता मिल्ट्रीचे चिफ कमांडर यांनी कोडग यांचा मुलगा मयूर कोडग याला संपर्क साधला. काही काळजी करू नका, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आम्ही लवकरच येत असल्याचे कळविले.

त्यानंतर काही वेळातच सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्या रात्रीतच सर्व 12 मुलांना लष्करी छावणीमध्ये सुरक्षित स्थलांतरीत करण्यात आले. त्या दिवशी एकीकडे शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर होण्याचा निर्णय जाहीर केला होता. दुसरीकडे त्यांनी सर्वसामान्य लोकांची कामे सुरूच ठेवली होती.तत्परतेमुळे मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना मिल्ट्रीने संरक्षण पुरवत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT