Mumbai News : अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयावरून दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्रही लिहीले होते. विधानपरिषदेच्या उपसभापतींनंतर आता अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालावर आमदार चित्रा वाघ यांनीही तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली असून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय ऐकून दु:ख झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुलीला एखाद्या निर्जन स्थळी नेणे, तिच्या पायजम्याच्या नाड्या सोडणं, तिला जबरदस्ती स्वतःकडे ओढणे याला बलात्काराचा प्रयत्न मानले जाणार नाही, असा निर्णय दिल्यानंतर न्यायालयाच्या या निरिक्षणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा निर्णय ऐकून दु:ख झाले आहे. कोणीही एखाद्या मुलीला किंवा महिलेला जबरदस्तीने खेचून नेले, तर त्याच्या वागण्यामधून त्याचा हेतू स्पष्ट होतो. अशा प्रकरणांमध्ये मुलीच्या वेदना आणि संवेदना नाकरण्यासारखे हे झाले, त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची विनंती आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी केली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी ठाम भूमिका घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील या वादग्रस्त निकालाची स्वतःहून दखल घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरल यांच्याकडे केली आहे. क्रिमिनल रिव्हिजन केस क्रमांक 1449/2024 वरील हा निकाल देशभरात चर्चेचा विषय ठरला असून, यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा निर्णय गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारा आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितेला केवळ शारीरिक इजा होत नाही, तर तिच्या आत्म्यावर, आत्मसन्मानावर आणि प्रतिष्ठेवरही गंभीर आघात होतो. हा निर्णय मुलींच्या वेदना आणि संवेदना नाकारण्यासारखा आहे आणि पुढे जाऊन गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारा ठरू शकतो. हा प्रत्येक स्त्रीचा आणि आपल्या संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाला विनंती आहे की, त्यांनी या निर्णयावर नक्की पुनर्विचार करावा, आपल्याला या निर्णयाबद्दल काय वाटतंय नक्की व्यक्त व्हा, असेही आमदार वाघ म्हणाल्या.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.