State government orders CID investigation into the aircraft accident involving Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश

Maharashtra government orders CID probe into Ajit Pawar plane crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सीआयडी चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Roshan More

Ajit Pawar plane crash CID inquiry updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता.28) त्यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्यावर गुरुवारी (ता.29) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. अजितदादांच्या निधनांतर राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. दरम्यान, सरकारने अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे.

फॉरेन्सिक टीमने अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. या अपघाताची नोंद बारामती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही बारामती पोलिसांना दिल्या आहेत.

...अन् विमान कोसळले

अजित पवारांच्या विमानाच्या अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले की, विमान खाली आले आणि परत वर गेले. ते हलकावे खात होते. नंतर ते खाली येताना धावपट्टी सोडून खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला.

हा केवळ अपघात...

अजित पवार यांच्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये, असे आवाहन अपघातानंतर ज्येष्ठे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT