Devendra Fadnavis on Maharashtra Electricity sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वीज ग्राहकांसाठी सुखद बातमी! वाढती वीजबिलं आता थांबणार? फडणवीसांनी घेतला दिलासादायक निर्णय!

Maharashtra Electricity : राज्यातल्या घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा वीजेच्या दरात कपात होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. फडणवीस यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली असून वीजेच्या दरात कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे राज्यातील घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा वीज ग्राहकांना आता वाढणाऱ्या वीज बिलापासून दिलासा मिळणार आहे.

फडणवीस यांनी पहिल्या वर्षी 10 टक्के आणि त्यानंतर टप्प्या टप्प्याने वीज दरात कपात केली जाईल. तर 5 वर्षात 26 टक्के वीज दर कमी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे फडणवीस यांनी?

‘राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात होणार आहे. पुढील 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी लाभ

दरम्यान, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून सुमारे 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे. शेतकऱ्यांना साडेसात एचपीपर्यंतच्या पंपाना मोफत वीज दिली जातेय.

यावरून आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.’ असंही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यांना होणार फायदा?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील वीज दरात पुढच्या पाच वर्षात कपात केली जाणार आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के आणि त्यानंतर पाच वर्षांमध्ये टप्प्या टप्प्याने 26 टक्के ही कपात केली जाणार आहे. तर याचा फायदा राज्यातील जे 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात अशा ग्राहकांना याचा लाभ अधिक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT