Devendra Fadnavis Nagpur roads : भाजप म्हणते, नागपूर शहरात एकही खड्डा नाही; पण महापालिका सर्वेक्षणात...

BJP Claim of Pothole-Free Roads in Nagpur Fails in Municipal Survey : भाजपच्या एका बड्या नेत्याने नागपूर शहरात एकही खड्डा नसल्याच्या केलेल्या दाव्यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Devendra Fadnavis Nagpur roads
Devendra Fadnavis Nagpur roadsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur civic body road report : नागपूर शहरातील खड्ड्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे शहर असल्याने येथील प्रत्येक घडामोडींकडे सर्वांचे लक्ष असते. विरोधकांचे कान टवकारलेले असतात.

यातच चार दिवसांपूर्वी भाजपच्या एका बड्या नेत्याने शहरात एकही खड्डा नसल्याचा दावा केला होता. याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातच महापालिकेने मॉन्सूनपूर्व केलेल्या सर्वेक्षणातून रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकडाच समोर आला आहे.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्यावतीने विशेष दक्षता घेतली जाते. नदी नाल्यांच्या सफाईचा कार्यक्रम हाती घेतला जातो. रस्त्यांवर पाणी साचू नये आणि अपघात होऊ नये यासाठी खड्डेसुद्धा बुजवले जातात. नागपूर महापालिकेने मॉन्सूच्या आधी एक सर्वेक्षण केले होते. त्यात नागपूरच्या रस्त्यांवर 409 खड्डे असल्याचे असल्याचे आढळून आले. ते बुजवण्यासाठी हॉटमिक्स प्लांटाकडे ही यादी देण्यात आली आहे. यातील निम्मे खड्डे अद्यापही बुजवलेले नाहीत. त्यावरून भाजपचे नेते नाराज आहेत. महापालिका आयुक्तांसोबत बैठका घेऊन भाजपचे (BJP) आमदार आपला रोष व्यक्त करीत आहेत.

नागपूर (Nagpur) महापालिकेत सुमारे साडेतीन वर्षांसून प्रशासक आहेत. ते जनतेच्या कामांना प्राधान्य देत नाहीत, तक्रारी ऐकत नाही, त्यामुळे आमदार आणि माजी नगरसेवक महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना हटवण्याची मागणी करीत आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा महापालिका आयुक्त बदलण्याचे निर्देश दिले होते.

Devendra Fadnavis Nagpur roads
Ahilyanagar Shiv Sena : 'जिथं शिवसेनेचे आजी-माजी होते, तिथं 'मशाल' घेऊनच लढणार'; 'मविआ'च्या जागावाटपावर ठाकरेंच्या शिलेदाराचा 'फॉर्म्युला'

काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात गडकरी यांच्या निर्देशाचा दाखल देऊन चौधरी यांची बदली करण्याची मागणी केली होती. अलीकडचे राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिकेच्या मुख्यालयात शहराच्या समस्यांवर सर्व आमदारांची बैठक घेतली होती.

Devendra Fadnavis Nagpur roads
Congress on Modi Government : लोकशाहीवर खतरनाक हल्ले, देशात 11 वर्षे अघोषित आणीबाणी!

काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आणि नितीन राऊत हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी आमच्या विधानसभा मतदारसंघात काय काय कामे केली अशी थेट विचारणाच आयुक्तांना केली होती. यावरून वादही निर्माण झाला होता. या दोन्ही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईवर रोष व्यक्त केला होता. त्यानंतर जागतिक योग दिनाच्या दिवशी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. त्यात त्यांनी नागपूर शहरात एकही खड्डा नसल्याचा दावा केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com