Ahilyannagar News : 100 दिवसांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 150 दिवसांचा 'विकसित महाराष्ट्र-2047' हा कार्यक्रम प्रशासनातील सुधारणांसाठी आज, मंगळवारी चौंडी (ता. जामखेड) येथे जाहीर केला. 6 मे ते 2 ऑक्टोबर, असा 150 दिवसांचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती 7 मे रोजी 100 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या विभागांचा सत्कार करताना देणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
जामखेड येथील चौंडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठकीनंतर(Cabinet Meeting) त्यांनी हा निर्णय जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यावेळी उपस्थित होते.
यापूर्वीच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात , साडेबारा हजार सरकारी कार्यालयांनी प्रशासकीय सुधारणा तसेच धोरणात्मक निर्णय घेतले. 48 विभागांनी 902 सुधारणा जाहीर केल्या होत्या. त्यातील 706 (78 टक्के) पूर्ण झाल्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या 100 दिवसांच्या कार्यक्रमानंतर आता मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसांचा 'विकसित महाराष्ट्र-2047' हा कार्यक्रम जाहीर केला. त्याचा 'रोड मॅप' तयार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या 100 दिवसांच्या कार्यक्रमानंतर आता मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसांचा 'विकसित महाराष्ट्र-2047' हा कार्यक्रम जाहीर केला. त्याचा 'रोड मॅप' तयार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
2029, 2035 व 2047, अशा तीन टप्प्यांचा रोडमॅप असेल. पहिल्या टप्प्यात कार्यालयांनी 100 टक्के ई-गव्हर्नन्स परफॉर्म्स करायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला कामासाठी सरकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. आवश्यक त्या सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा करायच्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दुसरा टप्प्यात सेवाविषयक सरकारी सुधारणा कार्यालयाच्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोकाभिमुख राज्यकारभार केला. त्याला अनुसरूनच जनतेसाठी सरकारची व प्रशासनाची जबाबदारी करण्यासाठी व उत्तरदायित्व ठरवण्यासाठी हा प्रशासकीय 150 दिवसांचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याचा निकाल 2 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.