Devendra Fadnavis News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा वारसदार बहुतेक महाराष्ट्रातून असेल असे मला वाटते आणि राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ ठरवेल असे मला वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण असेल,असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले, या क्षणी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असे दिसत आहे. म्हणूनच मोदींना बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. अशी चर्चा बंददाराआड करण्यात येते त्यामुळे पुढील नेता संघ ठरवेल आणि बहुतेक तो महाराष्ट्रातील असेल.
संजय राऊत यांनी मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून असे म्हटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानाच्या रेसमध्ये असल्याची चर्चा आहे. यावर खुद्द फडणीसांनी आपल्या मनात काय ते स्पष्ट सांगितले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नाही. माझासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो.
उत्तराधिकारी म्हणून चर्चा करणे योग्य नाही. वडील जिवंत असताना मुलाने तसा विचार करणे ही भारतीय संस्कृती नाही. ती मुघलांची संस्कृती आहे, असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकारणविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हमाले, सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. मात्र, एएसआय कायद्यानुसार कबरीला संरक्षण आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर आवडण्याचा आणि न आवडण्याचा प्रश्नच नाही. या कबरीला 50-60 वर्षापू्र्वीच संरक्षण मिळाले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थिमध्ये कबरीचे ग्लोरिफिकेशन होऊ देणार नाही.
राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून नद्यांच्या प्रदुषणाचा मुद्दा मांडला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या मुद्यांचा आम्ही विचार करू. नद्यांमधील प्रदूषण दूर करण्यासाठी सरकार कठीबद्ध आहे. त्या दृष्टीने काम देखील सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.