कोल्हापुरात शिवसेनेचं ( शिंदे गट ) महाअधिवेशन पार पडलं. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. बाळासाहेब असताना 'मातोश्री' हे पवित्र मंदिर होतं. आता 'मातोश्री' उदास हवेली झाली आहे. तिथून फक्त शिव्या-शापाचा आवाज येतो, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली आहे.
"बाळासाहेब असताना 'मातोश्री' हे पवित्र मंदिर होते. आता 'मातोश्री' उदास हवेली झाली आहे. बाळासाहेबांचं वास्तव्य होते, तोपर्यंत ते पवित्र मंदिर होते. आज तुम्ही कशापद्धतीनं वागत आहात? जिथून वाघाची डरकाळी फुटायची, तिथून रडगाण्याचा आणि शिव्या-शाप देण्याचा आवाज येतोय, दुसरं काही नाही. हे बाळासाहेबांनी कधी केलं नव्हते," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"वडील चोरले म्हणून रोज आरोप केला गेला. पण, बाळासाहेब कुणा एकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होते. त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं. सत्तेच्या मोहापायी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार, आचार आणि भूमिका सोडली," असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केला.
"मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर सभेतून व्यासपीठावरून खाली उतरण्यास सांगितलं. त्यांचं घर जाळण्यास माणसं पाठवली, हे कुणाचं कारस्थान? ज्याला सांगितलं तो आपल्याबरोबर आहे. मी रामदास कदमांना सांगितलं, तुम्ही षण्मुखानंद सभागृहात येऊ नका, तुमचाही मनोहरपंत करण्याचं चालू आहे. रामदास कदमांचा अपमान करण्याचं कारस्थान केलं गेलं. गजानन कीर्तिकरांना कितीवेळा परत पाठवलं, हे त्यांनाही माहिती आहे. याच लोकांनी शिवसेना मोठी केली आहे," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
"नारायण राणे, राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? त्यांचा तुम्हाला काय त्रास होता? का त्यांना घालवलं. बाळासाहेबांच्या मनात नव्हतं," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र डागलं आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.