Devendra Fadnavis, Santosh Deshmukh Sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : 'सीएम'च्या सूचनेनंतर यंत्रणा हलली; मोठी अपडेट घेऊन तपास अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला जाणार

Investigating officer news : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन या प्रकरणातील तपासाची माहिती देणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Beed News : बीड येथील संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास करणारे बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी फोन केला. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास करताना जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यासोबतच आतापर्यंत झालेल्या तपास कामांचा आढावादेखील यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन या प्रकरणातील तपासाची माहिती देणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या होत्या. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी बसवराज तेली, सचिन पाटील हे केज येथील विश्रामगृहावर जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यासोबतच आतापर्यंत करण्यात आलेल्या या प्रकरणातील तपासाची माहिती देणार असल्याचे समजते .

दरम्यान, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करताना जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी सोमवारी देशमुख कुटुंबबियानी आक्रमक होत आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी जोरात गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा. ज्यावर खंडणीचा आरोपी आहे त्यांच्यावर मोक्का लावला. खंडणीचे आणि खुनाचे आरोप एकच आहेत. जर त्यांच्यावर कारवाई नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT